संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Safest cars in India 2021 by Global NCAP | या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार

२ टिप्पण्या
सध्या पारंपरिक स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या विदेशी कंपनीच्या कार्सला भारतात उतरती कळा लागलीय. त्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय कंपन्यांनी बाजारात आणलेल्या नवीन दणकट आणि अति सुरक्षित कार्स (Safest cars in India 2021). जेव्हापासून भारतीय कंपन्यांनी सुरक्षित कार्स मार्केट मध्ये आणल्या, ग्राहकांनीही स्वतःच्या आणि परिवाराच्या सुरक्षेचा विचार सुरू केला. त्याआधी कोणीही कार विकत घेताना कार किती सुरक्षित आहे? याचा कधी विचारही केला नव्हता की सुरक्षेला प्राधान्यही दिले नव्हते. भारतीय ग्राहक वाहन विकत घेताना फक्त मायलेज आणि कमी किंमत या दोनच गोष्टींचा विचार करीत होता, परंतु आता हळूहळू का होईना हे चित्र पालटत आहे. अनेक ग्राहक आता नवीन कार विकत घेताना सेफ्टी रेटिंग, सेफ्टी फीचर्स तपासून कोणती कार विकत घ्यायची ते ठरवताना दिसत आहे. २०१४ पासून ग्लोबल NCAP ने भारतीय कार्स ची क्रॅश टेस्ट घ्यायला सुरुवात केली. global ncap rating for indian cars.
तर आजच्या लेखात जाणून घेऊया भारतातील सर्वात सुरक्षित कार्स कोणत्या आणि त्यांची थोडक्यात माहिती.

१. महिंद्रा XUV 3OO (Mahindra XUV 300):

XUV 300 ही महिंद्राची अत्याधुनिक सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 3OO ही क्रॅश टेस्ट मध्ये सर्वात सुरक्षित कार असल्याचे Global NCAP (G-NCAP) ने त्याचा अहवालात म्हटले आहे.  प्रौढांच्या सुरक्षेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 4 स्टार्स रेटिंग दिले आहेत. ही भारतातील सर्वात पहिली 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेली कार आहे. 
Mahindra XUV 300 Car
Mahindra XUV 300 is one of the Safest SUVs in India

सुरक्षेसाठी यामध्ये 2 एअरबॅग (ड्रायव्हर, पॅसेंजर), कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल असलेले एबीएस (ABS), रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर, फ्रंट पार्किंग सेन्सर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम, ट्रॅकशन कंट्रोल सिस्टीम (TCS), EBD, ESP इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.
या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन स्टँडर्ड 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे तसेच AMT ऑटोच्या पर्यायांसह डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 1.5 लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन 117 HP पॉवर आणि 300 Nm चा टॉर्क देते.

Global NCAP सुरक्षा रेटिंगः 5 स्टार
किंमत (भारतात) : ₹ 8.30 लाख - 12.70 लाख (एक्स-शोरूम)

२. टाटा अल्ट्रोज (Tata Altroz):

    टाटा अल्ट्रोज सध्या भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे (best safety hatchback cars in india). Global NCAP ने प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी सर्व व्हेरिएंट्सला 5 पैकी 5 स्टार रेटिंग आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 3-स्टार रेटिंग प्रदान केले.  ग्लोबल NCAP च्या अहवालानुसार टाटा अल्ट्रोज (Tata Altroz)
ड्रायव्हरच्या मानेला, डोक्याला आणि गुडघ्याला चांगले संरक्षण प्रदान करते, तर ड्रायव्हरच्या छातीला मिळणारे संरक्षण  पुरेसे आहे.  बॉडीशेल स्थिर असल्याचेही रेटिंग अल्ट्रोजला मिळाले. 
Tata Altroz Car
या हॅचबॅकमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडी व कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल असलेले एबीएस (ABS), रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर आणि आयसोफिक्स चाईल्ड सीट अँकरेज पॉईंट्स यासारख्या सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. अल्ट्रोज ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित आणि सर्वात स्वस्त प्रीमियम हॅचबॅक आहे. ही कार 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल मध्ये उपलब्ध आहे.  पेट्रोल युनिट 113 Nm चा टॉर्क आणि 85 bhp पॉवर उत्पन्न करते, तर टाटा अल्ट्रोज डिझेलमध्ये 89 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क उत्पन्न करते.  हे दोन्ही व्हेरिएंट्स केवळ मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहेत.

Global NCAP सुरक्षा रेटिंगः 5 स्टार
किंमत (भारतात) : ₹ 5.44 लाख - 9.49 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली)

३. टाटा नेक्सन (Tata Nexon)

    टाटा नेक्सन ही ग्लोबल NCAP पंचतारांकित रेटिंग मिळविणारी पहिली मेड इन इंडिया कार होती. प्रौढ प्रवासी संरक्षणाच्या बाबतीत या सब कॉम्पॅक्ट SUV ने 17 पैकी 16.06 आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 49 पैकी 25 गुण मिळवले.  ग्लोबल NCAP अहवालानुसार, नेक्सनने (Tata Nexon) चालक आणि समोरच्या प्रवाशाच्या डोके व मान यांना चांगले संरक्षण दिले तर त्यांच्या छातीला पुरेसा संरक्षण मिळाला.  बॉडीशेलला स्थिर म्हणून रेटिंग दिले गेले, तसेच अधिक लोड सहन करण्यास सक्षम आहे. 
Tata Nexon Car
Tata Nexon is one of the Safest SUVs in India
    टाटा नेक्सनला ड्युअल एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, रोल-ओव्हर मिटीगेशन, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, हिल-होल्ड कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, प्री-टेन्शनर्ससह ड्रायव्हर सीट बेल्ट आणि स्पीड अलर्ट यासारख्या सेफ्टी सुविधा आहेत. 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनसह ही कार उपलब्ध आहे.  पेट्रोल इंजिन 118 bhpसह 170 Nm टॉर्क देते, तर डिझेलमध्ये 108 bhp पॉवर व 260 Nm टॉर्क उत्पन्न करते.  दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AMT ट्रांसमिशनसह उपलब्ध आहेत.

Global NCAP सुरक्षा रेटिंगः 5 स्टार
Tata Nexon किंमत : ₹ 7.2 लाख ते 12.96 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली)

४. टाटा टिगोर (Tata Tigor):

ही 4 मीटर च्या आतील टाटा ची कॉम्पॅक्ट सेडान कार असून ह्या कारला सुद्धा GNCAP सेफ्टी टेस्ट मध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. 4 स्टार मिळवत टिगोर च्या रूपाने टाटाने कार सेफ्टी मध्ये हॅट-ट्रिक मारली. ही कार टियागो पेक्षा थोडी लांब असून मार्केटमध्ये ह्युंदाई एक्सेन्ट आणि स्विफ्ट डिझायर या सेदान कारशी टक्कर देण्यासाठी टाटाने कमी किमतीत उपलब्ध केली. सेडान टिगोरने (Tata Tigor) क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ  संरक्षणासाठी 4-स्टार रेटिंग मिळवले तर लहान मुलांच्या  संरक्षणासाठी 3-स्टार मिळवले. ड्रायव्हरसाठी आणि सह-प्रवाश्याच्या छातीला मिळणारे संरक्षण पुरेसे आणि किरकोळ होते. 
Tata Tigor Car

    सुरक्षेच्या दृष्टीने या सेदानमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडी , एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम इत्यादी फीचर्स मिळतात. टिगोरमध्ये सर्व आसन स्थानांवर 3 पॉईंट बेल्ट दिलेले नाही आणि आईसोफिक्स अँकरेज सुद्धा उपलब्ध नाही.
या कार मध्ये BS6 प्रमाणित पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन 1.2 लिटर 5-स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या टिगोरचे मायलेज 20.3 किलोमीटर/लिटर आहे. हे इंजिन 84.5 bhp पॉवर सह, 113Nm चा टॉर्क देते.

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Tata Tigor भारतात किंमत: 5.59 लाख - 7.73 लाख (एक्स-शोरूम)

५. टाटा टियागो (Tata Tiago):

एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक - टियागोला ग्लोबल NCAP ने 4-स्टार सेफ्टी रेटिंग प्रदान केल्याची घोषणा करत टाटाने सर्वांना चकित केले. ग्लोबल NCAP ने आपल्या क्रॅश टेस्ट अहवालात म्हटले आहे की टियागो चालक व प्रवाश्याच्या डोक्याला व मानेला चांगले संरक्षण मिळते, तर ड्रायव्हरच्या छातीला असलेली सुरक्षितता पुरेशी असल्याचे दिसून आले आहे. या कारचे (Tata Tiago) बॉडीशेल अस्थिर म्हणून रेटिंग दिले गेले आणि पुढील लोडिंगचा सामना करण्यास ते सक्षम नसल्याचे अहवालात म्हटले आहे. लहान मुलाच्या सुरक्षेच्या बाबतीत या हॅचबॅकला 3 -स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. 
Tata Tiago Car
best safety hatchback cars in india

    या हॅचबॅकमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडी व CSC सह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम इत्यादी फीचर्स मिळतात.
    टाटा टियागोमध्ये 1.2 लिटरचे तीन सिलेंडर इंजिन दिले गेले आहे जे 84 bhp पॉवर आणि 113 Nm चा टॉर्क उत्पन्न करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि 5-स्पीड AMT स्वयंचलित गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Tata Tiago भारतात किंमत: 4.69 लाख - 6.73 लाख (एक्स-शोरूम)

६. फोक्सवैगन पोलो (Volkswagen Polo):

फोक्सवॅगन वाहने त्यांच्या बळकट गुणवत्तेसाठी ओळखली जातात आणि ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे.  पोलोला ग्लोबल NCAP ने 4-स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान केले आहे. त्यांच्या अहवालानुसार, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरच्या डोके व मान यांना चांगली सुरक्षा मिळते तर, छातीला छातीला मिळणारे संरक्षण पुरेसे आहे.  बॉडीशेलला स्थिर म्हणून रेटिंग दिले गेले आणि पुढील लोड सहन करण्यास सक्षम आहे. VW Polo लहान मुलांना पुरेशी सुरक्षा प्रदान करते आणि या सुरक्षेसाठी 3-स्टार रेटिंग मिळाले आहे.
Volkswagen Polo 2021फोक्सवॅगन पोलोमध्ये ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी, आईसोफिक्स पॉईंट्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इ. सेफ्टी फीचर्स मिळतात. ही हॅचबॅक १.० लिटर MPI नैसर्गिकरित्या एस्पीरेटेड इंजिन आणि १.० लिटर TSI टर्बोचार्ज्ड युनिटमध्ये उपलब्ध आहे. पोलो MPI 75 BHP आणि 95 Nm टॉर्क उत्पन्न करते, तर पोलो TSI 108 BHP आणि 175 Nm टॉर्क देते.  VW Polo MPI केवळ 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते, तर पोलो TSI  6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहे.

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Volkswagen Polo भारतात  किंमत: ₹ 5.87 लाख - 9.67 लाख (एक्स-शोरूम)

७.  मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Vitara Brezza):

ग्लोबल NCAP Crash Test मध्ये मारुती सुझुकीने खराब कामगिरी केली आहे. चार स्टार रेटिंग मिळविणारी या ब्रँडची विटारा ब्रेझा ही एकमेव कार आहे. प्रौढ संरक्षणामध्ये 17 पैकी 12.51 (4-star) आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 49 पैकी 17.93 (2 Star) गुण मिळवले.  Crash Test मध्ये या SUVने ड्रायव्हरला आणि सह प्रवाशाच्या डोके व मानेला चांगले संरक्षण दिले पण ड्रायव्हरच्या छातीला कमी संरक्षण मिळते. SUVच्या बॉडीशेलला स्थिर आणि अधिक लोडिंगचा सामना करण्यास सक्षम म्हणून रेटिंग दिले गेले.
Vitara brezza

मारुती सुझुकी विटारा ब्रेझामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, थ्री-पॉईंट सीटबेल्ट, सीटबेल्ट रिमाईंडर आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या सुविधा आहेत.  ही एसयूव्ही 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते जे 103 bhp पॉवर आणि 138 Nm टॉर्क देते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4-स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Vitara Brezza भारतात  किंमत: ₹ 7.52 लाख - 11.26 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली)

८. महिंद्रा मराझो (Mahindra Marazzo):

Global NCAP नुसार ही भारतातील सर्वात सुरक्षित MPV (Multi-Purpose Vehicle) आहे. या 7-सीटर प्रीमियम MPV ने Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार रेटिंग मिळवले. एवढे रेटिंग मिळविणारी महिंद्रा मराझो ही पहिली सात सीटर कार ठरली आहे. 
 
Mahindra Marazzo, 7 Seater MPV

 
या कारमध्ये सुरक्षेसाठी डबल एअरबॅग्स, 4-चॅनेल ABS, क्रॅश सेन्सर, EBD, स्पीड अलर्ट, ड्रायव्हरसाठी SBR, थ्री-पॉईंट सीटबेल्ट, सीटबेल्ट रिमाईंडर आणि आईसोफिक्स अँकरेज सारख्या मानक वैशिष्ट्यांसह, महिंद्रा मराझोने प्रौढ संरक्षणात 4 स्टार आणि मुलाच्या संरक्षणात 2 स्टार मिळविले. Crash Test मध्ये या MPV ने ड्रायव्हरला आणि सह प्रवाशाच्या डोके व मानेला चांगले संरक्षण दिले पण ड्रायव्हरच्या छातीला मिळणारे संरक्षण तुलनेने कमी आहे. या MPV च्या बॉडीशेलला स्थिर आणि अधिक लोडिंगचा सामना करण्यास सक्षम म्हणून रेटिंग दिले गेले.
    महिंद्रा मराझो (Mahindra Marazzo) 1.5 लिटर डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असून हे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 120.96 bhp पॉवर आणि 300 Nm चा टॉर्क उत्पन्न करते. मॅरेझोचे मायलेज 17.3 किमी प्रतिलिटर आहे.

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Mahindra Marazzo भारतात  किंमत: 12.03 लाख - 14.12 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली)

९.  रेनॉ ट्रायबर (Renault Triber):

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार म्हणून ओळखली जाणारी रेनो ट्रायबर (Renault Triber) किती सुरक्षित आहे, याची Global NCAP ने टेस्ट घेतली आहे.  रेनो ट्रायबरला GNCAP कडून 4-स्टार प्रौढ सुरक्षा आणि 3-स्टार चाईल्ड सुरक्षा रेटींग देण्यात आले आहे (Renault Triber Global NCAP crash tests Rating). ही कार पहिल्यांदा ऑगस्ट 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. या कारमधील तिसऱ्या रांगेतील आसने वेगळी करता येते तसंच आवश्यकता नसल्यास ते फोल्डही करता येतात, त्यामुळे अधिक सामान वाहून नेता येते.
Renault Triber, 7 Seater MPV

4 स्टार मिळवणारी ही कार मात्र अस्थिर बॉडीशेल आणि अधिक लोडिंगचा सामना करण्यास अक्षम असल्याचे G-NCAP ने त्यांचा अहवालात म्हटले आहे. Crash Test मध्ये या MPV ने ड्रायव्हरला आणि सह प्रवाशाच्या डोके व मानेला चांगले संरक्षण दिले पण ड्रायव्हरच्या छातीला मिळणारे संरक्षण तुलनेने कमी आहे.
    या MPV कार मध्ये 4 एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत.
या कारमध्ये 1.0 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क उत्पन्न करतं.

Global NCAP सुरक्षा रेटिंग: 4-स्टार
Renault Triber भारतात  किंमत: 5.30 लाख - 7.65 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली).

(Note: All the brand names mentioned above are their Registered brand names.)
(Image Credit: All the above images are taken from respective Brand's websites.)
Posted By: TheAutoGyan

Related Posts

२ टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा