उत्तर प्रदेशातील युवकाचा कारनामा- पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर मात करणारे संशोधन
नवीन बाईक म्हटलं की आपण भारतीय पहिला प्रश्न विचारतो, तो म्हणजे "कितना देती है?"
युपीतील कौशांबी (Kaushambi District) जिल्ह्यातील विवेक कुमार पटेल (Vivek Kumar Patel) नावाच्या एका युवकाने एक असा पराक्रम केला आहे, जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. विवेक हा कौशम्बी जिल्ह्यातील गुदडी गावातील राहणारा असून 2001 मध्ये 12 वीत असताना त्याला फिजिक्स मध्ये एक फॉर्म्युला मिळाला होता. विवेकने सांगितले की, या फॉर्म्युल्याचा मी बाईक, जनरेटर आणि इतर वाहनांचा एवरेज (average) वाढवण्यासाठी प्रयोग करून पाहिला. शेवटी तो यशस्वी ठरला. हा प्रयोग इतर मोठ्या वाहनांसाठी यशस्वी ठरला तर ऑटोमोबाईल्स (Automobiles) क्षेत्रासाठी मोठा चमत्कार ठरेल. तसेही, आपल्या भारतातील लोकांना हे टेक्नॉलॉजीचे (Technology) कारनामे करणे, काही अवघड नाही. कारण असे कारनामे तर आपल्याकडे लहानपणापासून करायला सुरुवात केली जाते. मग योग्य संधी मिळाली की आपल्या बुद्धीच्या जोरावर ते यशस्वी सुद्धा करतात.
![]() |
| चित्र: विवेक कुमार पटेल |
यासाठी विवेकने पिपरी, पहाङपुर या गावातील एका मिस्त्रीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे त्याने जवळजवळ दोन वर्षे या फॉर्म्युल्यावर काम केले. या प्रयत्नांचे फळ त्याला तेव्हा मिळाले, जेव्हा उत्तर प्रदेश काऊंसिलिंग फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Uttar Pradesh Counselling for Science and Technology) आणि मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रयागराज (Motilal Nehru National Institute of Technology, Allahabad) ने प्रमाणित केले.
...आणि मायलेज झाले दुप्पट
विवेक कुमार च्या मते, त्याच्या या तंत्रज्ञानामुळे बाइकचा एवरेज 153 किलोमीटर प्रतिलीटर होईल, जो साधारणपणे फक्त 50-60 चा एवरेज देते. विवेकने सांगितले की, बाईक रिपेअरिंग शिकण्याच्या दरम्यान त्याने इंजिनातील बदलांमध्ये टेस्ट करायला सुरुवात केली. मग 2012 मध्ये बजाजची ङिस्कवर बाईक खरेदी केली. त्यानंतर त्याच्या इंजिनात बदल केले. या बदलामुळे त्याचा एवरेज ङबल झाला. अखेरीस विवेकच्या 17 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने सांगितले की, एवरेज वाढवण्यासाठी बाईक मध्ये असलेला कार्बोरेटर (Carburator) बदलून तो स्वतः बनवलेला कार्बोरेटर लावायचा. यासाठी त्याला 500 रु. खर्च यायचा. विवेकने स्वतःच्या बाईकला हा कार्बोरेटर बसवून 153 किमी/लिटर चा मायलेज मिळवला आहे. विवेकला या कामासाठी काही जवळच्या लोकांनी मदत केली आहे.
इनोव्हेशन ची मान्यता...
विवेक च्या कारनाम्याला इनोवेशन विभागाची मान्यता मिळाली आहे असे UPCST चे इनोवेशन अधिकारी संदीप द्विवेदी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की विवेक ने बनवलेल्या पार्टची आणि इंजिनाची पूर्ण तपासणी मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात झाली आणि त्यानंतरच मान्यता देण्यात आली. विवेकच्या या कल्पनेचा पाया अत्यंत मजबूत आहे, आणि त्यामुळेच ह्या तंत्रज्ञानाचे पेटंट साठी विवेक ने अर्ज केला आहे असेही द्विवेदी यांनी सांगितले.
युपीसीएसटीचे डायरेक्टर श्री. राधेलाल ( UPCST Director Mr. Radhelal) यांच्या मते विवेकने पेट्रोल सप्लाय कमी करून एवरेज वाढवण्याची शक्कल लढवली आहे. या दरम्यान बाईकच्या मायलेज (bike mileage) मध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच पेट्रोलच्या कमी वापराने इंजिन सुद्धा गरम होत नाही. त्यामुळे पेट्रोल जास्त लागत नाही पण त्यामुळे स्पीड आणि पिकअप मध्ये देखील काही परिणाम झाला नाही. या टेक्निक चे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद (MNNITA) च्या मेकॅनिकल इंजिनियर ङिपार्टमेंट मध्ये टेस्टिंग करण्यात आले आहे.
पुढील लक्ष "जनरेटर" वर...
यानंतर विवेक ने आकाश श्रीवास्तव (श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी, कटरा चा विद्यार्थी) नावाच्या एका मेकॅनिकल इंजिनिअर सोबत जनरेटर (Diesel Generator)च्या प्रोजेक्ट वर काम सुरू केलंय. त्यांचं म्हणणं आहे की बाईक प्रमाणेच ते या जनरेटर मधेही बदल करून किंवा नवीन तंत्रज्ञान विकसित करून जनरेटर ला कमीत कमी डिझेल लागेल असे तंत्रज्ञान विकसित करणार आहे.
त्याने सांगितले की, या नव्या प्रोजेक्टसाठी कंपनीला 75 लाख रुपयांची मदत केंद्राने पुरवली आहे. त्याच्या या नवीन स्टार्टअपसाठी जम्मू-काश्मीर मधील श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी, कटरा (Shri Mata Vaishno Devi University, Katra)च्या टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटरने (Technology Incubation Centre) त्याला "स्टार्टअप" म्हणून नोंदणी करण्यास मदत केली आहे.
Posted By : TheAutoGyan



टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा