शिकाऊ लायसन्ससाठी अनेक खटाटोप करावे लागतात. परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरून अर्ज करावा लागते. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून (RTO) उपलब्ध दिनांकानुसार अपॉईंटमेंट (appointment by RTO) दिली जाते. नशीबवान लोकांना या परीक्षेची तारीख लवकरच मिळते, नाहीतर किमान दोन/तीन महिने तरी प्रतिक्षा करावी लागतेच. एवढे होऊनही परीक्षेत पास होणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे, कारण आपल्या सर्वांना अनुभव आहेच की एजंट ला पैसे दिल्याशिवाय कितीही परीक्षा दिल्या तरी RTO परीक्षेत/ड्राइविंग टेस्ट मध्ये पास करतच नाही. हा खटाटोप टाळण्यासाठी किंवा अपॉईंटमेंट लवकरच मिळवण्यासाठी काही जण एजंटचीही मदत घेतात. त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यानंतर परीक्षा पास होणाऱ्यांना आरटीओकडून लायसन्स उपलब्ध होते.
हा सर्व खटाटोप टाळण्यासाठी परिवहन विभागाने घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड/नंबर असणे गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर लायसन्स सुविधा उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि नंतर अर्ज करु शकेल. अर्ज प्रक्रिया पार करण्यासाठी परिवहन विभागाकडे परीक्षा शुल्क भरावे लागेल त्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय पुढील पृष्ठावर येईल. त्यानंतर रस्ते सुरक्षेचा एक व्हिडीओ येईल. तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रियेत त्याला परीक्षा द्याावी लागणार.
उमेदवारांना काढावी लागणार लायसन्सची प्रिंट
ज्याप्रमाणे MSCIT ची परीक्षा दिल्यानंतर लगेच परीक्षेचा निकाल कॉम्पुटर स्क्रीनवर दिसतो त्याचप्रमाणे RTO ची लर्निंग लायसन्ससाठीची परीक्षा दिल्यानंतर काही वेळातच परीक्षा पास झाल्याचे ऑनलाईन समजेल तसेच मोबाईलवर संदेशही येईल. त्याचवेळी पास झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन शिकाऊ लायसन्स (Online Learning License) उपलब्ध होणार आहे. त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ सांभाळून ठेवावी लागेल, त्याचा उपयोग नंतर पर्मनंट ड्राइविंग लायसन्स (Permanent Driving License) काढतेवेळी होणार आहे.
शिकाऊ लायसन्ससाठी घरात बसून ऑनलाईनही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे आरटीओत येण्याची गरज लागणार नाही. ही नवीन योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी विभागाच्या हालचाली सुरू आहे, सोबतच आरटीओत येऊनही परीक्षा देण्याचा पर्याय पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
परिवहनच्या संकेतस्थळावर (RTO website) परीक्षार्थींचे आधार नंबर लिंक न झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास ती व्यक्ती घरबसल्या परीक्षा देऊ शकणार नाही अश्या वेळी त्या व्यक्तीला अपाईंटमेंट घेऊन आरटीओत जाऊन परीक्षा देता येणार आहे.
थोडक्यात step by step माहिती:
१. परिवहन (RTO) च्या वेबसाईटवर जा
2. ऑनलाइन लर्निंग लायसन्स चा पर्याय निवडा
3. आता आधार नंबर प्रविष्ट करा
4. पूर्ण माहिती भरून/तपासून सबमिट करा
5. ऑनलाइन पेमेंट करा
6. उपलब्ध असलेल्या तारखेवर अपॉइंटमेंट घ्या आणि त्या तारखेला ऑनलाइन परीक्षा द्या, घरबसल्या.
7. परीक्षा दिल्यावर लगेच कॉम्पुटर वर निकाल दिसेल तसेच मोबाईलवर सुद्धा sms येईल.
8. पास झाल्यास ऑनलाइन लर्निंग लायसन्स मिळेल, त्याची प्रिंट काढून सांभाळून ठेवा, तसेच त्या लायसन्सची एक लिंक sms ने मोबाईलवर सुद्धा येईल.
काही प्रश्न असेल तर खाली कॉम्मेंट मध्ये नक्की विचारा किंवा Contact Us मधून संपर्क करा.
Posted by - TheAutoGyan


टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा