संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

10 bad habits of Car drivings | १० चुकीच्या सवयी ज्यामुळे आपण आपल्याच वाहनाला नुकसान पोचवतो

तुम्ही नुकतेच कार (Car) चालवायला सुरुवात केली असेल किंवा तुम्ही एक्स्पर्ट ड्राइवर असाल किंवा तुम्ही खूप जुने ड्राइवर असाल तरीही तुमच्याकडून जाणते-अजाणतेपणे  काही ना काही अश्या चुका होतातच ज्यामुळे कारचं नकळत काही-ना-काही नुकसान होत असते. त्या नुकसानीमुळे वाहनाचे/कारचे वयोमान तर घटतेच पण त्यावर येणाऱ्या खर्चामुळे खिश्यावरही ताण पडतो.

चला तर जाणून घेऊया अश्या काही चुकीच्या सवयी ज्यामुळे नकळत आपण आपल्याच वाहनाला नुकसान पोहोचवत असतो. 


१. कार चालवताना एक हात स्टिअरिंग वर आणि एक हात गियर वर ठेवणे:

यामध्ये वाईट किंवा चुकीचं असं काही वाटत नसलं तरी हि सवय कारच्या आरोग्यासाठी म्हणजेच गेअरबॉक्स साठी घातक आहे. सतत गियरनॉब (Gear knob) वर हात ठेवल्याने गियर शिफ्टिंग लिव्हर वर दाब पडून गेयरबॉक्स (Gearbox) च्या आतील गियर चे "दाते" (Gear tooth) घासल्या जातात. त्यामुळे गियर स्लिप होण्याचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो. हे गियर बदलून नवीन बसवण्यासाठी खर्च आणि वेळही जास्त लागतो. त्यामुळे कार चालवताना शक्यतो दोन्ही हात स्टिअरिंगवर असू द्या. लॉन्ग ड्राईव्ह मध्ये दोन्ही हात स्टिअरिंग वर असल्यास थोड्या वेळाने हात दुखून येतात, अश्यावेळी एक हात आर्मरेस्ट वर किंवा मांडीवर ठेवू शकता. गियर वर हात ठेवण्याची हि एक सवय बदलली तरीही तुमच्या कारचं  आयुष्य वाढण्यास नक्की मदत होईल. 


one hand on steering and another on gear knob


२. लगेच इंजिन बंद करणे:

आजकाल बहुतेक कार्स मध्ये टर्बोचार्ज (Turbo Charged Engine) इंजिन उपलब्ध आहेत. हे टर्बो इंजिन खूप जास्त RPM वर फिरत असतात,  त्यामुळे या टर्बोचार्जर्स चे तापमान इंजिन च्या तापमानापेक्षा  जास्तच असते. त्यामुळे जर तुम्ही लॉन्ग ड्राईव्ह म्हणजेच अगदी १०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त कार चालवून परत आल्यास किंवा हाय स्पीड वर कार चालवल्यास लगेच कारचे इंजिन  बंद करू नका. इंजिन लगेच बंद केल्यास टर्बोचार्जरच्या अतितापमानामुळे ते लवकर खराब होऊ शकते किंवा त्याची कार्यक्षमता कमी होऊन टर्बोचार्जर निकामी होऊ शकते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी वाहन थांबवल्यानंतर १५ ते ३० सेकंद इंजिन सुरु राहू द्यावे व नंतर पूर्ण बंद करावे. यामुळे टर्बोचार्जर आणि इंजिन दोघांचेही आयुष्य वाढेल आणि कार चा परफॉर्मन्स टिकून राहील. 


turbo charger operation diagram
Picture Credit: Google images


३.  स्पीड कमी केल्यांनतर गियर कमी न करणे: 

आपल्या देशात स्पीडब्रेकर आणि खड्डे जागोजागी आहेत. अश्या खड्डेमय किंवा स्पीड ब्रेकर असलेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना आपण ब्रेकर च्या आधी वाहनाचा वेग कमी करतोच पण काही तरुण आणि असे लोक ज्यांना उगाच आपल्या कार ला रेस करण्याची सवय असते ते स्पीड कमी करूनही गियर कमी (Gear downshift) करत नाहीत. परिणामी स्पीड ब्रेकरनंतर वाहनाचा वेग वाढवताना इंजिनवर ताण पाडतो, सिलेंडर हेड, क्लच प्लेट (Clutch Plates) आणि ट्रान्समिशन सिस्टीम (Automobile Transmission System) सुद्धा डॅमेज होतो आणि इंधनही जास्त लागते. या सर्वांचा परिणाम टायर वरही होतो, टायरची झीज जास्त होते. त्यामुळे स्पीड कमी केल्यावर लगेच गियर downshift  करायला विसरू नका कारण प्रत्येक गियर ची कमी आणि जास्त वेगमर्यादा ठरलेली असते.  त्या मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त वेग असल्यास गेअरबॉक्सला डॅमेज होण्याचे चांसेस नक्कीच वाढतात. "योग्य वेळी, योग्य गेअर शिफ्टिंग"चा हा नियम पाळा नाहीतर इंजिन, टायर आणि पेट्रोलवर जास्तीचा खर्च करण्यास तयार राहा. 

gerabox and clutch plate
Picture Credit: Google Images


४. वाहन चालवताना पाय क्लच आणि ब्रेकवर ठेवणे:


कित्येक लोकांना वाहन/कार चालताना पाय क्लच किंवा ब्रेक पेडलवर ठेवण्याची सवय असते. ह्या सवयीमुळे क्लच प्लेट आणि ब्रेक पॅड लवकर घासल्या जाऊन निकामी होतात. त्यामुळे कार/ वाहन चालवताना पाय क्लच किंवा ब्रेकच्या बाजूला असलेल्या फुटरेस्ट वर ठेवावा. फुटरेस्ट उपलब्ध नसल्यास खालीच फ्लोअरमॅट  वर ठेवावा. त्याचप्रमाणे जर तुम्ही सिग्नलवर वाट पाहत थांबले असाल त्यावेळी क्लच दाबून ठेवून कार थांबवण्यापेक्षा कार न्यूट्रल करून हँडब्रेक (handbrake) लावून थांबवून ठेवा. त्यामुळे क्लच वर ताण पडणार नाही. अश्याप्रकारे क्लच वर पाय ठेवण्याची सवय बदलून तुम्ही कारचं नुकसान होण्यापासून टाळू शकता. 


५. उतारावर ब्रेक दाबून ठेवणे किंवा इंजिन बंद करणे:

कित्येकजणांना सवय असते कि उतारावर कार चालवताना स्पीड कंट्रोल करण्यासाठी ब्रेक दाबून ठेवतात किंवा अर्धा ब्रेक दाबून कर चालवतात. त्यामुळे नुकसान असे होते कि ब्रेक पॅड्स घासून जास्त झिजतात किंवा आधीच झिजलेले असेल तर ब्रेक पॅड्स तुटून ब्रेक फेल सुद्धा होऊ शकते. मग वाहन थांबवणे आणि अपघात टाळणे अशक्य होऊन बसते. उतारावर वेग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कार पहिल्या किंवा दुसऱ्या गियर चालवू शकता त्यामुळे ब्रेक न दाबताही वेग कंट्रोल होतो. काही लोकांना सवय असते कि इंधन वाचवण्यासाठी ते उतारावर वाहन/इंजिन (Engine) बंद करून चालवतात. आपल्याला महित आहेच कि आजकाल प्रत्येक कार मध्ये पॉवर स्टिअरिंग सोबतच भरपूर सर्व सुविधा ह्या इंजिन सुरु असतानाच वापरल्या जाऊ शकतात. म्हणजे इंजिन सुरु असेल तरच ABS म्हणजे ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशयन (EBD), एअरबॅग्स  (Airbags), स्टिअरिंग (Steering) इत्यादी काम करतात. उतारावर इंजिन बंद केल्यास स्टिअरिंग लॉक होऊन ते फिरवणे कठीण होते, ब्रेक दाबल्या जात नाही किंवा अपघात झाल्यास एअरबॅग्स उघडल्या जात नाही. म्हणून उतारावर किंवा चालत्या कारमध्ये कधीही इंजिन बंद करू नये. हि एक सवय तुमच्या आणि परिवाराच्या जीवावर बेतू शकते. 


६. पहिल्या गियर वर कर टेक-ऑफ न करणे:

अनेक कार चालकांना खासकरून तरुण चालकांना सवय असते कि कार सुरु केल्यानंतर ती दुसऱ्या-तिसऱ्या गियर मधेच असताना टेक-ऑफ करतात म्हणजे पुढे चालवत जातात. कार चालवताना कधीही पहिल्या गियर वरच चालवण्यास सुरुवात करावी व नंतर स्पीड नुसार गियर वाढवत जावे. सुरुवातीला दुसऱ्या किंवा तिसऱ्या गियर वर कार चालवल्यास गेअरबॉक्स वर अतिरिक्त ताण पडून गियर-टूथ घासल्या जातात. त्यामुळे गेअरबॉक्सचे  व परिणामी कारचे आयुष्य घटते. 


७. फक्त गियर लावून पार्किंग करणे:

कार पार्किंग ला लावताना किंवा उभी ठेवताना अनेकजणांना सवय असते कि ते फक्त कारला पहिल्या, दुसऱ्या किंवा कोणत्याही गियर मध्ये टाकतात आणि कार उभी करून मोकळे होतात. पण हि सवय कारच्या गेअरबॉक्स साठी अतिशय घातक आहे. फक्त गियर वर पार्किंग केल्याने उतार  भाग असेल किंवा सपाट भाग जरी असेल तरीही गियर वर ताण पडतो. कधी-कधी कारला धक्का दिल्यास कार हळू-हळू पुढे सरकू शकते त्यामुळे अपघात होऊन नुकसान होऊ शकते. म्हणून कार पार्किंग करताना गियर सोबतच हॅन्डब्रेक पण अवश्य लावावा, म्हणजे गेअरबॉक्स खराब होणार नाही. 


८. अचानक ब्रेक दाबणे किंवा अचानक स्पीड वाढवणे:

वाहन चालवताना अनेकजण मजा म्हणून वाहनाचा स्पीड अचानक वाढवतात व अचानक ब्रेक दाबून कमी करतात. अचानक स्पीड वाढवल्याने इंजिन हेड, क्लच प्लेट व गेअरबॉक्सवर अतिरिक्त ताण पडून ते लवकर खराब होतात शिवाय पेट्रोल जास्त जळते तो खर्च वेगळा. अचानक ब्रेक दाबून स्पीड कमी केल्याने ब्रेक पॅड्स जास्त घासतात, इंजिन सिलेंडर हेडवर प्रेशर वाढते शिवाय पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून वाहनाचे नुकसान होणार ते वेगळे. कधीकधी अचानक ब्रेक दाबल्याने वाहन स्लिप होऊन समोरच्या वाहनावरही धडकू शकते. त्यामुळे स्मूथ वाहन चालवण्यावर भर द्या, जेणेकरून इंजिन चांगले राहील आणि वाहनाचे नुकसानही होणार नाही. 


९. इंजिन सुरु केल्यांनतर लगेच कार वेगात पळवणे:

कार किंवा कोणतेही वाहन सुरु केल्यांनतर ३०-६० सेकंद न्यूट्रल मध्ये तसेच इंजिन सुरु राहू द्यावे. त्यामुळे इंजिन ऑइल पूर्ण इंजिन मध्ये सुरळीत सप्लाय होऊन इंजिनचा एकेक पार्ट स्मूथ कार्य करू शकेल आणि इंजिन वर कोणताही ताण येणार नाही. अचानक वाहन सुरु करून वेगाने वाहन पळवल्यास इंजिन च्या काही भागात ऑइल न पोचल्यामुळे घर्षण होऊन त्याची झीज होऊन इंजिन मध्ये ब्रेकडाउन होऊ शकते. थंडीच्या दिवसात तर इंजिन सुरु केल्यांनतर ३०-६० सेकंद वाहन नक्की सुरु करून ठेवावे व नंतरच चालवावे.


१०.  वाहनांची काळजी न घेणे:

तुम्ही कितीही चांगले ड्राइवर असाल पण तुम्ही कारची योग्य काळजीच घेतली नाही तर तिचे आयुष्य वाढणार कसे. आपल्या वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे, टायर तपासणे, खराब झाल्यास बदलणे, व्हील अलायमेन्ट (Wheel Alignment) वेळोवेळी करणे, आवश्यकता असल्यास व्हील बॅलन्सिंग करणे, इंजिन ऑईलची लेवल आणि  चिकटपणा तपासणे, कूलंटची लेवल (Coolant Level) आणि ते चांगले आहे कि खराब झाले हे तपासणे.


Car's instrument clustre with warning lights

कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर बिघाड झाल्याची वॉर्निंग दाखवल्यास ते ठीक करणे, टायरचे प्रेशर कारच्या मॅन्युअल मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे कि नाही ते तपासणे; या सर्व गोष्टी एक कार चालक-मालक स्वतः अगदी काही मिनिटात तपासून आपल्या वाहनांची योग्य काळजी घेऊ शकतो. वेळोवेळी कारची योग्य आरोग्य तपासणी केली तर नक्कीच तुमची कार दीर्घायुषी होईल आणि तुमच्या खिश्यावर अतिरिक्त खर्च पडू देणार नाही. 


Posted By : TheAutoGyan



Related Posts

टिप्पणी पोस्ट करा