संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Maruti Suzuki Brezza CNG details leak | मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी लवकरच येणार

टिप्पणी पोस्ट करा

मारुती सुझुकी लवकरच Maruti Suzuki Brezza CNG व्हर्जन भारतीय बाजारात आणणार आहे, जे त्याच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या सब कॉम्पॅक्ट SUV सुझुकी विटारा ब्रेझाचा सीएनजी प्रकार आहे. याशिवाय मारुतीच्या स्विफ्ट आणि डिझायर या कार सुद्धा CNG मॉडेल टेस्ट करताना रस्त्यावर आढळून आल्या आहेत आणि येत्या काळात लवकरच लॉन्च करणार आहे. Brezza CNG कारची स्पर्धा आगामी Tata Nexon CNG या Compact SUV सोबत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


Maruti Suzuki Vitara Brezza Price in India


Maruti Suzuki Brezza CNG ची वैशिष्ट्ये

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्यानंतर, अनेक कार वापरकर्ते आता कार खरेदी करण्यापूर्वी विचार करत आहेत की हॅचबॅक, सेडान किंवा एसयूव्ही डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी विकत घायची की CNG कार खरेदी करायची. पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढल्यापासून भारतामध्ये CNG कारची विक्री वाढली आहे.  अशा स्थितीत अनेक कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय गाड्यांचे CNG व्हेरिएंट लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.  या प्रयत्नात, मारुती सुझुकी आपली सर्वात जास्त विक्री होणारी Mid-size SUV मारुती सुझुकी विटारा ब्रेझा चे सीएनजी मॉडेल अर्थात Maruti Brezza CNG लाँच करणार आहे.
brezza cng on road price in mumbai

ग्राहकांना मिळेल स्वस्त इंधन पर्याय

Maruti Suzuki Vitara Brezza दीर्घ काळापासून कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी, महिन्याला जवळपास १२ हजार कार्स विक्री होणारी, मध्यम आकाराची SUV आहे आणि अशा परिस्थितीत, कंपनीला त्याचे सीएनजी मॉडेल लाँच करून लोकांसमोर एक उत्तम पर्याय ठेवायचा आहे, जेणेकरून लोकांनी इतर दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या कारकडे पर्याय म्हणून पाहू नये. पेट्रोलच्या दररोजच्या वाढत्या किमती बघता Vitara Brezza च्या नुसत्या पेट्रोल मॉडेल ऐवजी आता पेट्रोल+CNG असा पर्याय ग्राहकांसाठी वरदान ठरेल. मारुतीच्या Arena डीलरशिपद्वारे विकल्या जात असलेल्या विविध कार्स CNG मॉडेल मध्ये उपलब्ध करून देण्याचा तयारीमध्ये कंपनी आहे.  सध्या मारुती सुझुकीच्या अनेक सीएनजी कार भारतात विकल्या जातात ज्यामध्ये मारुती एस-प्रेसो सीएनजी, मारुती अल्टो सीएनजी, मारुती वॅगनआर सीएनजी, मारुती सेलेरियो सीएनजी, मारुती एर्टिगा सीएनजी, मारुती ईको सीएनजी यांचा समावेश आहे. आता लवकरच मारुतीच्या स्विफ्ट, डिझायर आणि ब्रेझ्झा CNG मॉडेल्स भर पडणार आहे. आधीच्या अनुभवानुसार मारुतीच्या टॉप मॉडेल्स (ZXI  आणि ZXI +) मध्ये CNG चा पर्याय दिलेला नाही, त्याचप्रमाणे आगामी ब्रेझ्झा आणि इतर व्हेरिएंटमध्येही टॉपच्या मॉडेलमधे CNG चा पर्याय असण्याची शक्यता कमीच आहे. फक्त LXI  ते VXI याच मॉडेल्समध्ये CNG उपलबध असू शकते. असे मानले जाते की मारुती ब्रेझा सीएनजी आगामी टाटा नेक्सन सीएनजीशी स्पर्धा करेल.  खरं तर, इंधनाच्या वाढत्या किमती बघता टाटा मोटर्स देखील त्यांच्या  लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हीचे CNG Variant लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

Brezza CNG इंजिन वैशिष्ट्ये:

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नवीन brezza CNG मध्ये 1.5 लीटर (१४६२ CC) K15 नॅचरली एस्पिरेटेड इंजिन असू शकते जे आधीच्या ब्रेझ्झा मध्ये आहे. हे CNG इंजिन 6000 RPM वर 91 bhp पॉवर आणि 4,400 आरपीएमवर 122 Nm पर्यंत टॉर्क उत्पन्न करेल. याच्या स्टॅंडर्ड व्हर्जनमध्ये (पेट्रोलवर) हेच इंजिन १०४ bhp पॉवर आणि १३८ Nm चा टॉर्क उत्पन्न करेल. ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह दिली जाईल.  येणाऱ्या काळात मारुती ब्रेझाची उर्वरित वैशिष्ट्येही कळतील.

CNG व्हेरिएंट मध्ये इंजिनचा पॉवर आणि टॉर्क दोन्ही कमी असले तरी त्याचा सामान्य किंवा दररोजच्या वापरावर काहीही परिणाम पडणार नाही. याउलट, CNG मॉडेलमध्ये पेट्रोल इंजिन पेक्षा जवळपास दीडपट जास्त मायलेज मिळू शकते. कंपनी नुसार सध्या Brezza च्या डिझेल इंजिन मॅन्युअल व्हेरिएंटपासून १७.०३ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज मिळते तर स्वयंचलित (ऑटोमॅटिक) व्हर्जनपासून १८.७६ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज मिळते.

टाटांच्या कार देऊ शकतात टक्कर

याशिवाय Maruti Brezza च्या २०२२ च्या मॉडेलमध्ये नवीन फीचर्स आणि डिझाईन मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल पाहायला मिळू शकते. मारुती प्रमाणेच टाटा मोटर्स देखील त्यांच्या लोकप्रिय कार्समध्ये CNG चा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये टाटाच्या Tiago, Tigor, Altroz आणि Nexon या मॉडेल्सचा समावेश असू शकतो. Tata Nexon CNG मॉडेल याआधीच कंपनीच्या पुण्यातील प्लांटजवळ चाचणी करताना आढळले आहेत. Global NCAP मध्ये आधीच ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळवलेली आणि अत्यंत लोकप्रिय TATA Nexon आता CNG मध्ये आल्यास मारुतीच्या Brezza CNG ला भक्कमपणे टक्कर देऊ शकते. टाटा नेक्सन सुद्धा महिन्याला जवळपास १०,००० कार्सची विक्री नोंदत नवनवीन रेकॉर्ड रचत आहे.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा