संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Precautions to take when filled Wrong Fuel in Car | कारमध्ये चुकीचे इंधन भरल्यास काय करावे...

टिप्पणी पोस्ट करा

Filled Petrol in diesel car ? Or Filled Diesel in petrol car? Then don't worry, this informative article is just for you.

कधी कधी असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या वाहनामध्ये (चारचाकी) चुकीचे इंधन टाकले आणि नंतर मग टेन्शन मध्ये आलात किंवा भविष्यात अशी चूक झालीच तर काय करावे, काय करू नये हे आज तुम्ही या लेखात वाचू शकता.
डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकणे विशेषतः सोपे आहे आणि चुकून पेट्रोलच्या टाकीमध्ये डिझेल टाकणे देखील शक्य आहे कारण पंप वरील पेट्रोल टाकण्याचा नोझल हा डिझेलच्या नोझलपेक्षा लहान असतो.
सामान्यतः कारमध्ये चुकीचे इंधन टाकणे जसे, पेट्रोल कार मध्ये डिझेल टाकणे किंवा डिझेल कार मध्ये पेट्रोल टाकणे अश्या घटना पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे होतात किंवा मग आपण स्वतः चुकीच्या लाईनमध्ये (जिथे पेट्रोल आणि डिझेलसाठी वेगवेगळे पंप असतात) उभे राहिल्याने.
पेट्रोलपेक्षा डिझेल हे जड असते, पेट्रोल ची घनता (density) ही 720-745 ग्राम/लिटर असते तर डिझेलची घनता 820- 845 ग्रॅम/लिटर असते. त्यामुळे पेट्रोल हे डिझेल मध्ये मिक्स होणार नाही तर डिझेलच्या वर तरंगेल. त्यामुळे डिझेल कार मध्ये पेट्रोल भरल्यानंतर ही चूक आपल्याला लगेचच लक्षात येणार नाही. पेट्रोल हे डिझेलपेक्षा जास्त ज्वलनशील आहे त्यामुळे ते लगेचच पेट घेते आणि गाडी लगेच सुरू होते. परंतु काही अंतर गेल्यानंतर इंजिन मध्ये गडबड होऊन मोठा आवाज यायला लागेल तसेच इंजिन व्यवस्थित चालणार नाही आणि मग आपल्या लक्षात येईल की गाडीमध्ये चुकीचे इंधन भरले गेले आहे. जुने डिझेल शिल्लक आहे तोपर्यंत इंजिनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. एकदा का जर डिझेल संपले आणि फ्युएल टॅन्कमधील पेट्रोल इंजिनमध्ये जायला सुरुवात झाली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो.
पेट्रोल आणि डिझेल वाहनाचे इंजिन आणि त्यांची कार्यप्रणाली वेगवेगळी असते. पेट्रोल इंजिनमध्ये गाडी सुरू करण्यासाठी स्पार्क प्लग असतात तर डिझेल इंजिनमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतो.
आधी आपण डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिनची कार्यप्रणाली आणि त्यातील फरक समजावून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढील माहिती सहज समजू शकेल.

पेट्रोल इंजिनची कार्यप्रणाली

पेट्रोल इंजिनला स्पार्क इग्निशन इंजिनसुद्धा म्हटले जाते. या इंजिनमध्ये, हवा आणि पेट्रोलचे मिश्रण कारब्युरेटर मध्ये होऊन ते मिश्रण इंजिनच्या सिलेंडर मध्ये प्रवेश करते. पिस्टनच्या धक्क्याने इंधन-हवेचे मिश्रण कॉम्प्रेस केल्यानंतर, स्पार्क प्लग द्वारे निघणारी ठिणगी त्यास प्रज्वलित करते, ज्यामुळे पेट्रोलचे ज्वलन होते. या पेट्रोल ज्वलनामुळे (burning) हवेचा दाब वाढून पॉवर स्ट्रोक दरम्यान पिस्टनला धक्का देतो, हा पिस्टन क्रॅन्कशाफ्टला जोडला असल्यामुळे क्रॅन्कशाफ्ट फिरतो पुढे गिअर्सच्या प्रणालीद्वारे ही गती वाहनाच्या चाकांना फिरवते. अशाप्रकारे पेट्रोल इंजिन "स्पार्क इग्निशन" तंत्रावर कार्य करते
Petrol put in Diesel car


Petrol filled in diesel car
पेट्रोल इंजिनची कार्यपद्धती

डिझेल इंजिनची कार्यप्रणाली:

डिझेल इंजिन स्पार्क प्लग ऐवजी हवेच्या दबावावर काम करतात. हवा कॉम्प्रेस केल्यामुळे (प्रेशर वाढल्यामुळे) कंबशन चेंबरमध्ये (सिलेंडरच्या आत) हवेचे तापमान उच्च प्रमाणात वाढते (जवळपास ४०० ते ५०० ℃). त्यावेळेस तिथे आवश्यकतेनुसार डिझेलचा फवारा फ्युएल इंजेक्टर द्वारे सोडला जातो. एवढ्या उच्च तापमानावर डिझेल आपोआप प्रज्वलित होते, पिस्टन वर हवेचा दाब वाढून पिस्टन आणि परिणामी इंजिन सुरु होऊन वाहनाला गती मिळते. अशाप्रकारे डिझेल इंजिन उच्च वायुदाबावर कार्य करते.
Wrong fuel filled in Car
हवा कॉम्प्रेस करून कार्य करताना डिझेल इंजिन

तर आता बघूया कि कार मध्ये चुकीचे इंधन टाकले गेले तर या दोन्ही इंजिनमध्ये काय काय प्रॉब्लेम उद्भवू शकतात.
डिझेल टाकीमध्ये पेट्रोल टाकल्याने होणारे नुकसान हे पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्यावर होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त होते.
१. जेव्हा पेट्रोल डिझेलमध्ये मिसळले जाते तेव्हा ते डिझेलचे लुब्रिकेशन गुणधर्म कमी करते, ज्यामुळे इंजिनच्या आतील फिरणाऱ्या पार्टस मध्ये घर्षण जास्त होऊन धातूचे कण तयार होऊन पार्टस खराब होऊ शकतात आणि इंजिनचे मोठे नुकसान होईल.  
२. आधी सांगितल्याप्रमाणे डिझेल इंजिनमध्ये हवेवर दबाव आणून त्याचे तापमान वाढवले जाते त्यामुळे डिझेल ऐवजी पेट्रोल इंजिनमध्ये गेले तर एवढ्या उच्च तापमानावर इंजिनमध्ये पेट्रोलचा स्फोट होऊन इंजिन विचित्र आवाज करते, इंजिन व परिणामी वाहन जोरात धक्के मारल्यासारखे जाणवेल. पेट्रोलमुळे इंजिनमध्ये हवेचा अतिरिक्त दाब वाढून इंजिन फुटण्याची शक्यता देखील वाढते.
डिझेल पंप नोजल बहुतेक पेट्रोल नोझलपेक्षा मोठे असते, त्यामुळे पेट्रोल कारमध्ये चुकीचे इंधन टाकण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
पेट्रोल इंजिनमध्ये डिझेल टाकल्यास सहसा जास्त नुकसान होत नाही. 
जोपर्यंत इंजिनमध्ये पेट्रोल शिल्लक आहे तोपर्यंत वाहन चालेल त्यांनतर इंजिन मधून धूर येऊन इंजिन बंद पडेल. स्पार्क प्लग आणि इंधन प्रणाली बंद होईल. पेट्रोल कार मध्ये स्पार्क प्लग असतो. ज्यावेळेस डिझेल इंजिनमध्ये पोचेल तेव्हा ते पेट घेणार नाही कारण, स्पार्क प्लगमुळे कोणतेही तापमान वाढत नाही आणि डिझेल प्रज्वलित करायला एवढा स्पार्क पण पुरेसा नाही.
पेट्रोलमुळे डिझेल इंजिनला होणारे नुकसान इतके वाईट नाही. एकदा डिझेल पूर्ण काढल्यानंतर पेट्रोल इंजिनला कायमचे नुकसान होण्याचा धोका पूर्णपणे टळून जातो.


चुकीचे इंधन टाकल्यास काय करावे.

  1. ही चूक लक्षात आल्यास अशावेळी घाबरुन जाऊ नये. कार ताबडतोब बंद करून कंपनीच्या जवळच्या सर्विस सेंटरशी किंवा कंपनीच्या नंबरवर कॉल करून मदत मागावी किंवा जवळपासच्या मेकॅनिकची मदत घेऊन इंधनाची टाकी साफ करावी आणि इंजिनाच्या ज्या भागात पेट्रोल /डिझेल  गेले असेल ते पूर्ण काढून घ्यावे. असे केल्याने गाडीच्या इंजिनला आणि आतल्या पार्ट्सला काही नुकसान होणार नाही किंवा कमीतकमी नुकसान होईल.
  2. चुकीच्या इंधनामुळे कार बंद पडल्यास ती न्यूट्रल करून धक्का मारून रस्त्याचा कडेला घ्यावी. जबरदस्तीने वारंवार, धक्के मारून कार सुरु करण्याचा प्रयत्न करू नये.

चुकीचे इंधन टाकल्यामुळे आपल्या कारचे नुकसान झाल्यास वॉरन्टी आणि कारची विमा पॉलिसीही वैध राहणार नाही. त्यामुळॆ चुकीचे इंधन टाकल्यास होणाऱ्या पूर्ण नुकसानीचा खर्च तुमच्या खिश्यावर पडेल.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा