संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

टाटा सफारी आणि महिंद्रा XUV700 तुलना | Comparison Tata Safari Vs.Mahindra XUV700

टिप्पणी पोस्ट करा

Tata Safari विरुद्ध Mahindra xuv700

अलीकडेच लॉन्च झालेली टाटा सफारी (Tata Safari) ही भारतातील टाटा मोटर्सची फ्लॅगशीप कार आहे. बराच काळ भारतीय मार्केट गाजवणारी ती एक आयकॉनिक एसयूव्ही आहे. काही काळ पडद्याआड राहिल्यानंतर टाटाने 'सफारी'ला अगदी नवीन अवतारात, सर्व आधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह पुन्हा मार्केट मध्ये आणले आहे. 2021 मध्ये बाजारात स्पर्धा करण्यासाठी जुन्या सफारीला पूर्णपणे अपडेट केले गेले आहे.

2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700

दुसरीकडे महिंद्रा XUV700 हि सुद्धा भारतीय कंपनीची एक लक्झरी कार आहे. महिंद्राने सुद्धा नवीन XUV 700 ला स्पोर्टी, मस्क्युलर लुक मध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले. या श्रेणी आणि किमती मध्ये याआधी कोणत्याही कारमध्ये दिलेली नाही अशी आधुनिक तंत्रज्ञान सुसज्ज अशी हि XUV 700 टाटा सफारीची थेट प्रतिस्पर्धी आहे. सुरक्षित कार्स बनवण्याच्या बाबतीत या दोन्ही भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत. म्हणून, या दोन 7-सीटर SUVचे तुलनात्मक विश्लेषण (Comparison) करून कोण BEST आहे ते आज बघू.

 

1. एक्सटेरिअर

Tata Safari ही हॅरियरचे 7 सीटर व्हर्जन आहे. सफारीचा फ्रंट दिसायला हॅरियर सारखा असून बोनटवर LED DRL, झेनॉन HID प्रोजेक्टर हेडलॅम्प युनिट आणि फ्रंट ग्रिलवर क्रोम ट्राय-एरो मार्किंग आहे. समोरून अगदी हरियर सारखी दिसणारी सफारी बाजूने बघितल्यास किती लांब आहे याचा अंदाज येतो, तसेच वर रेलिंग असलेले याचे रूफ मागच्या बाजूला थोडे उंच असलेले ठळकपणे दिसून येते. याचे 18 इंच ऍलोय व्हील्स या SUV ला खुप बोल्ड आणि मस्क्युलर लुक देतात. मागील बाजूला काळ्या एलईडी टेल लॅम्पमुळे सफारी खूपच स्पोर्टी दिसते. एकूणच, टाटाची नवीन सफारी बाहेरून पूर्ण प्रीमियम दिसते.


2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700


दुसरीकडे, महिंद्रा XUV700 चे बॉनेट सुद्धा अत्यंत पिळदार असून यामध्ये नवीन ग्रिल डिझाइनमध्ये आकर्षक उभे स्टील बार बघायला मिळतात. याशिवाय XUV700 सोबतच महिंद्राचा नवीन लोगो देखील बघायला मिळतो. महिंद्रा XUV700 मधे 17 किंवा 18 इंच आकाराचे डायमंड कट ऍलोय व्हील्स उपलब्ध असेल. याचे टेलगेट (मागचा दरवाजा) स्पोर्टी लुक मध्ये असून हा प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणाने बनवलेला आहे, जे कदाचित भारतात कारमध्ये पहिल्यांदाच वापरले गेले असावे. मागच्या बाजूने अपघात झाल्यास हा दरवाजा धातूच्या दरवाज्याप्रमाणे डेंटिंग-पेंटिंग करून दुरुस्त करता येणार नाही, तर तो पूर्ण नवीन बदलावा लागेल. नवीन XUV 700 सुद्धा दिसायला अत्यंत प्रीमियम आहे.


2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700

2021 टाटा सफारी (4661 mm) महिंद्रा एक्सयूव्ही 700 पेक्षा थोडी कमी लांब आहे तसेच व्हीलबेस सुद्धा 9 mm ने कमी आहे. सफारीची रुंदी 1894 mm तर XUV 700 ची रुंदी 1890 mm आहे, सफारीची उंची 1786 mm तर XUV 700 ची उंची 1755 mm आहे. या दोन्ही एसयूव्हीची रुंदी आणि व्हीलबेस जवळपास सारखीच आहे.

 

2. इंटिरियर

नवीन Tata Safari मध्ये ऑयस्टर व्हाईट कलर स्कीमसह सॉफ्ट टच आणि अँटी-रिफ्लेक्टीव्ह पृष्ठभागासह डॅशबोर्ड पाहायला मिळतो. सफारीमध्ये मोठा पॅनोरामिक सनरूफ अँटी-पिंच वैशिष्ट्यासह येतो. सरकणाऱ्या मधातल्या सिट्स, एम्बिएन्ट मूड लाइटिंग, ऑटोमेटिक टेम्परेचर कंट्रोल, कूल्ड स्टोरेज बॉक्स, 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट ऍडजस्टेबल लंबर सपोर्टसह येतात. डॅशबोर्डवर ऍप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 8-इंच फ्लोटिंग आयलंड टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 9-स्पीकर जेबीएल ऑडिओ सिस्टम, 7-इंच रंगीत टीएफटी डिस्प्लेसह इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉईस रिकग्निशन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. टाटा सफारी मध्ये iRA (इंटेलिजंट रिअल-टाइम असिस्ट) हि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजि दिलेली आहे ज्याद्वारे जिओफेन्सिंग आणि टाइम-फेंसिंग, व्हॅलेट मोड, लाइव्ह ट्रॅकिंग, घुसखोरी अलर्ट, लाइव्ह व्हेईकल डायग्नोस्टिक्स, ड्राइव्ह पॅटर्न ऍनालिसिस, रिमोट कमांड्स, OTA अपडेट्स आणि बरेच काही करता येते.


2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700


महिंद्रा XUV700 मध्ये एक अतिशय सुव्यवस्थित आणि प्रीमियम केबिन मिळते. XUV700 5 आणि 7 सीट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यात मोठ्या आरामदायक सीट्स, प्रीमियम कुशन आणि अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. यात अलेक्सा सपोर्ट आणि अड्रेनॉक्स कनेक्टड कार टेक्नॉलॉजी (AdrenoX Connected Car Technology) आहे, त्यामधून व्हॉईस कमांड देता येते जे फोन कॉल करणे, सनरूफ नियंत्रित करणे, म्युझिक चालवणे यासारखे सुमारे ९० पेक्षा जास्त काम करू शकते. इतर प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये सोनी कंपनीचे 12-स्पीकर्स, एक सबवूफर, 3D सराउंड साउंड सिस्टम, 6-वे पॉवर ऍडजस्टेबल सीट; मेमरी आणि वेलकम फंक्शनसह आणि एक पॅनोरॅमिक सनरूफ जे केवळ टॉप-एंड व्हेरिएंट्समधेच उपलब्ध असेल. यात मर्सिडीज प्रमाणे 10.25 इंच आकाराचा टॅब्लेट सेंट्रल टचस्क्रीन आणि पुर्णतः डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. या पॅनल खालीच मोबाईल साठी एक वायरलेस चार्जरची सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच, एअर-प्युरिफायर सिस्टीमसह ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, डे अँड नाईट IRVM, Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी पर्यायांचा समावेश आहे.

 

3. सुरक्षा वैशिष्ट्ये


Tata Safariच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये मागे आणि पुढे डिस्क ब्रेक, 6 एअरबॅग्स, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लॅम्प, चाइल्ड सीट ISOFIX अँकर पॉइंट्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, EBD आणि ESC सह ABS, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड आणि डिसेंट कंट्रोल, रोल ओव्हर मिटिगेशन, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट, डायनॅमिक व्हील टॉर्क बाय ब्रेक आणि बरेच फंक्शन्सचा समावेश आहे. टाटा आधीच वाहनांच्या 5 स्टार सुरक्षेत अग्रणी आहे आणि यावेळी सुद्धा टाटा सफारी कडून आपण 5 स्टार सुरक्षेची अपेक्षा करू शकतो. (टाटा सफारीची क्रॅश टेस्ट / सेफ्टी टेस्ट अजून झालेली नाही).

महिंद्रा XUV700 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फ्रंट, साइड आणि कर्टन एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX सीट माउंट्स, हिल होल्ड/डिसेंट फंक्शन आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (DSP) सारखी वैशिष्ट्ये आहेत. धडकेपासून बचावासाठी समोर आणि मागच्या बाजूला कॅमेरे व रडार दिलेले आहेत सोबतच ऑटोनॉमस एमरजन्सी ब्रेक (AEB) सुद्धा आहेत. इतर सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ड्रायव्हर ड्रॉउझीनेस डिटेक्शन (ड्राइवरला झोप येत असल्यास कार अलर्ट देते), ऑटो हाय बीम असिस्ट (Auto High beam Assist) आणि बूस्टर हेडलाइट्स (Booster headlights) आहेत जे 80 km/hr किंवा जास्त वेगात वाहन असल्यास हेडलाईटचा प्रकाश वाढवतात. ABS आणि ESP सोबतच गुडघ्यासाठी एक एअरबॅग मिळून एकूण 7 एअरबॅग (7 Airbags) उत्तम सुरक्षा प्रदान करतील. ADAS प्रणाली रस्त्यावरील दिशानिर्देश आणि सुचनाबोर्ड वाचून ड्रायव्हरला सूचना देते.

Tata Safari आणि Mahindra XUV700 दोघांमध्येही सुविधा आणि वैशिष्ट्यपूर्ण टेक्नॉलॉजी अगदी भरगच्च दिलेली आहेत. परंतु, Mahindra XUV700 मध्ये असलेली अत्याधुनिक ADAS आणि AdrenoX टेक्नॉलॉजी तसेच सुरक्षेचे उपाय येथे टाटा सफारीच्या टेक्नॉलॉजी पेक्षा वरचढ ठरते. टेक्नॉलॉजी आणि सुरक्षेमध्ये Mahindra XUV700 विजेता ठरतो.


4. 2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700 - इंजिन आणि किंमती

 

2021 Tata Safari मध्ये 2.0 लिटर क्रायोटेक टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन वापरले आहे तर Mahindra XUV700 अगदी नवीन 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन आणि mStallion 2.0 टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही SUV मध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा स्वयंचलित गिअरबॉक्ससह सुविधा आहेत. सफारी डिझेल इंजिन 168 bhp पॉवर व 350 Nm टॉर्क (1750 ते 2500 rpm वर) उत्पन्न करतात. Mahindra XUV700 डिझेल व्हेरिएंट्समध्ये 155hp ते 185hp एवढा पॉवर व 360 ते 450 Nm टॉर्क (1500 ते 2800 rpm वर) उत्पन्न करतात. पेट्रोल वर्जनमध्ये 2.0-लीटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन जे 5000 rpm वर 197 bhp पॉवर आणि 1750 ते 3000 rpm वर 380 Nm चा पीक टॉर्क उत्पन्न करते. सफारी मध्ये सिटी, इको आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायविंग मोड्स आहेत तर XUV700 डिझेल इंजिन पर्यायामध्ये मध्ये zip, zap आणि zoom हे तीन ड्रायविंग मोड्स आहेत. सफारी फक्त फ्रंट व्हील ड्राईव्ह (FWD) पर्यायामध्ये उपलब्ध आहे तर XUV700 फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) या दोन्ही इंजिन पर्यायामध्ये आहे.

सफारीची प्रास्ताविक किंमत ऍडव्हेंचर पर्सोना एडिशनसाठी (स्वयंचलित ट्रान्समिशनसह) ₹14.69 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि ₹21.45 लाख रुपयांपर्यंत जातात. दुसरीकडे Mahindra XUV700 पेट्रोल कार ₹ 11.99 लाख रुपयांपासून सुरु होऊन ₹14.99 लाख रुपयांपर्यंत जाते आणि डिझेल कारची किंमत ₹ 12.49 लाख रुपयांपासून सुरु होते.

 

5. 2021 Tata Safari Vs. Mahindra XUV 700 Result | निकाल


आम्ही 2021 Tata Safari विरुद्ध Mahindra XUV700 च्या तुलनेत विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या दोघांमध्ये इंजिन क्षमता, इंजिन प्रकार (पेट्रोल/डिझेल) वेगवेगळे असून महिंद्रा XUV700 टाटा सफारीपेक्षा वरचढ ठरते. सुरक्षा सुविधा आणि तंत्रज्ञान मधेही XUV700 वरचढ आहे. त्याच प्रमाणे AWD आणि FWD पर्यायांसह पुन्हा XUV700 बाजी मारते. सर्व गोष्टींमध्ये टाटा पेक्षा जास्त सुविधा असूनही XUV700 ची किंमत tata Safari पेक्षा कमीच आहे. त्यामुळे येथेही XUV700 च भाव खाऊन जातो.
एकंदरीत, आमच्या comparison test मध्ये Mahindra XUV700 हीच सर्वगुणसंपन्न असून या दोघांमध्ये तीच BEST आहे असे सिद्ध होते.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा