संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Difference between BSIV and BSVI Technology and their working principle | BS 4 आणि BS 6 मधील तंत्रज्ञान, त्यांची कार्यप्रणाली आणि फरक

टिप्पणी पोस्ट करा

दिवसेंदिवस वाढत चाललेले वायू प्रदूषण आणि त्यामुळे होणारी जागतिक तापमान वाढ हा एक चिंतेचा विषय बनला आहे. याच जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा असमतोल वाढून अनेक नैसर्गिक आपत्ती जगावर धावून येत आहेत. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दरवर्षी अनेक देशातील प्रमुख नेते आणि मंत्र्यांची जागतिक दर्जाची बैठक होत असते आणि त्यात अनेक नवनवीन उपाययोजना सुचवल्या जातात तसेच त्यावर कृती करून त्या प्रत्यक्षात आणल्या जातात. त्यापैकीच एक आहे वाहन प्रदूषण मानके (Vehicle Emission Norms). प्रत्येक देशात त्या त्या देशाने ठरवलेली प्रदूषण मानके आहेत, तसेच भारतात देखील भारत स्टेज (BS) स्टँडर्ड आहेत आणि काळानुसार ते जागतिक दर्जाचे स्टँडर्ड सोबत update होत राहतात. सध्या भारतात "भारत स्टेज 6" सर्व नवीन वाहनांसाठी लागू आहे.

Difference between bs4 and bs6, Compare BS4 and BS6, difference between BS4 and BS6, BS4 Vs BS6,


BS6 नियमाप्रमाणे वाहनातून सोडल्या जाणाऱ्या वायूमध्ये विषारी वायूंचे प्रमाण आधीपेक्षा खूप कमी करण्यात आले आहे त्यामुळे वाहन निर्मात्यांना याच BS6 च्या नियमात बसणारी इंजिन आणि वाहने तयार करावी लागतात. BS6 हे जागतिक दर्जाचे उत्सर्जन मानक (emission norms) आहे जे युरोपियन देशांच्या युरो 6 (Euro 6) च्या बरोबरीने आहेत.

BSES (Bharat Stage Emission Standard) ही देशातील सर्व प्रकारच्या वाहनांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणारी शासकीय संस्था आहे. BSES ने सन 2000 मध्ये "इंडिया 2000" नावाने प्रथम उत्सर्जन नियम सादर केले. BS 2 आणि BS 3 स्टँडर्ड अनुक्रमे 2005 आणि 2010 मध्ये लागू करण्यात आले होते. पूर्वीच्या स्टँडर्ड पेक्षाही जास्त कडक BS4 स्टँडर्ड सन 2017 साली आपल्या देशात लागू केले गेले. 

स्वच्छ वातावरणासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, भारत सरकारने प्रदूषणाचे निकष BS4 वरून लवकरच म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून BS 6 वर आणले, त्यामुळे BS4 वरून BS5 वर जाण्याऐवजी BS6 लागू करण्यात आले.


Difference between BSIV and BSVI


उत्सर्जन निकष (बीएस 4 वि. बीएस 6) | Emission Norms (BSIV Vs. BSVI)

● BS 4 आणि BS 6 हे दोन्ही उत्सर्जनाचे नियम आहेत जे कार, दुचाकी किंवा इतर वाहनातून बाहेर पडणार्या धुरामध्ये जास्तीत जास्त किती प्रमाणात प्रदूषक वायू असावेत हे ठरवतात. बीएस 4 पेक्षा बीएस 6 उत्सर्जन मानक जास्त कडक आहेत. 

● BS4 उत्सर्जन निकष मोटार वाहनाला 80mg/km पेक्षा कमी NO2 (नायट्रोजन ऑक्साईड) उत्सर्जित करण्याची परवानगी देते तर BS6 उत्सर्जन निकषांमध्ये तेच प्रमाण 60mg/km पर्यंत कमी केले आहे. पेट्रोल वाहनांसाठी पर्टिक्युलेट मॅटर (PM) BS6 उत्सर्जन व्यवस्थेत 4.5mg/km पर्यंत मर्यादित आहे.

● बीएस 6 नियमांनुसार प्रदूषणाची मर्यादा मोठ्या प्रमाणात कमी केली गेली आहे.  BS4 मध्ये डिझेल वाहनांमधून NOx चे प्रमाण 250mg/km असताना, BS6 उत्सर्जन निकषांमध्ये ते 80mg/km पर्यंत कमी केले आहे.  HC+NOx BS4 मध्ये 300mg/km वरून 170mg/km पर्यंत कमी केले आहे, तर PM पातळी 25mg/km वरून 4.5mg/km पर्यंत कमी केली आहे.

● बीएस 6 उत्सर्जन निकष केवळ मोटार वाहनांसाठीच नाही तर इंधनासाठी देखील आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड महत्वाची भूमिका बजावतात. BS4 च्या तुलनेत BS6 इंधनात कमी सल्फर आणि NOx आहे. BS4 इंधनात सल्फरचे प्रमाण 50ppm असताना, BS6 इंधनात ते पाच पट कमी म्हणजेच 10ppm वर आहे.  

● इंजिनच्या आत योग्य लुब्रिकेशन साठी सल्फर महत्वाची भूमिका बजावते; परंतु, BS6 इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण BS4 इंधनाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे BS6 इंधनामध्ये काही एडिटिव टाकलेले असतात जेणेकरून इंजिनला योग्य लुब्रिकेशन मिळेल.

● BS6 नियमांनुसार, बीएस 6 मोटर वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन (SCR) आणि डिझेल पर्टिक्युलेट फिल्टर (DPF) समाविष्ट केले गेले जे या आधी BS4 नियमांमध्ये समाविष्ट नव्हते.

● BS 6 नियमांमध्ये रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) आणण्यात आले आहे जेणेकरून मोटार वाहनातून होणारे उत्सर्जन रिअल-टाइम आधारावर मोजले जाईल. RDE याआधी BS4 नियमांचा भाग नव्हता.

● BS6 वाहनामध्ये BS4 इंधन वापरल्यास त्यामधून विषारी वायूंचे उत्सर्जन जास्त होईल, जे BS6 निकषांमध्ये बसत नाही, म्हणूनच BS 6 वाहनाला इच्छित उत्सर्जन पातळी साध्य करण्यासाठी फक्त बीएस 6 इंधन वापरावे लागते.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण बघू शकतो की BS4 आणि BS6 स्टँडर्ड मध्ये प्रदूषक वायूंच्या उत्सर्जन लिमिटमध्ये किती बदल झाला.


BS 4 Vs. BS 6 emission norms


पेट्रोल इंजिनांमध्ये तांत्रिक बदल | Technology Change in Petrol Engines

भारत स्टेज -6 च्या निकषांनुसार, कार्बन मोनोऑक्साइडचे उत्सर्जन 30% आणि NOx 80% ने कमी करायचे आहे.  BS-6 निकषांमध्ये हायड्रोकार्बन आणि धूर कण उत्सर्जनासाठी मर्यादा ठरवलेल्या आहेत जे पूर्वीच्या BS 1 ते 4 निकषांमध्ये समाविष्ट नव्हते. भारत स्टेज 6 च्या उत्सर्जन निकषांची पूर्तता करण्यासाठी पेट्रोल वाहनामधील कार्बोरेटर्स बदलून त्याऐवजी प्रोग्राम केलेले फ्युएल इंजेक्टर लावणे आवश्यक आहे. उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी, एक्झॉस्ट सिस्टीममध्ये (सायलेन्सर मध्ये) 3-वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स बसवले जातील. सर्व BS-6 वाहनांसाठी ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक सिस्टीम (OBD) अनिवार्य आहे.


डीझेल इंजिनमधील तांत्रिक बदल | Technology Change in Diesel Engines

भारत स्टेज -6 नियमांनुसार, डीझेल इंजिनमधील NOx उत्सर्जन हे 70 % आणि पर्टीक्युलेट उत्सर्जन 80% कमी करणे आवश्यक आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, वाहने युरो -6 अनुरुप तंत्रज्ञानासह सुसज्ज असणे आवश्यक आहे.

यासाठी आवश्यक मुख्य तांत्रिक बदल:

● एक्सझॉस्ट सिस्टिम मध्ये डिझेल पर्टीक्युलेट फिल्टर बसवणे आवश्यक आहे. 

● NOx उत्सर्जन कमी करण्यासाठी सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन (SCR) किंवा एक्सझॉस्ट गॅस रिसर्कुलेशन तंत्रज्ञान वापरणे.

● उत्सर्जन संबंधित पार्ट्सच्या बिघाडावर लक्ष ठेवण्यासाठी  एक ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक सिस्टम आवश्यक आहे


BS6 (BSVI) डिझेल इंजिन कसे काम करतात? | Working of BS 6 Diesel Engine

NOx उत्सर्जन कमी करण्यासाठी, 2.0 लीटर वरील सर्व डिझेल इंजिनांना सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन (SCR) ची गरज आहे. हे SCR युनिट कॅटॅलिस्टच्या मदतीने नायट्रोजन ऑक्साईड (NOx) ला डायऍटॉमिक नायट्रोजन (N2) आणि पाणी (दोन्ही निरुपद्रवी उत्पादने) मध्ये रूपांतरित करते. NOx उत्सर्जन कमी करण्यासाठी SCR युनिट AdBlue किंवा डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड वापरते. हा द्रव (फ्लूईड) दोन घटकांचा बनलेला आहे - युरिया आणि डिआयोनाईज्ड पाणी. जेव्हा एक्झॉस्ट गॅस अॅडब्लू फ्लुइडच्या संपर्कात येतात, युरियाचे अमोनिया आणि कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतर होते आणि हा अमोनिया NOx चे रूपांतर नायट्रोजन आणि पाण्याच्या वाफेमध्ये करते, ज्यामुळे प्रदूषण कमी होते.

केवळ SCR तंत्रज्ञान 90 % पर्यंत NOx कमी करू शकते आणि डिझेल इंजिनला BS 6 मानदंडात बसण्यास पात्र ठरवते.

BS 6 मापदंडामध्ये बसण्यासाठी लहान डिझेल इंजिन (2.0 लिटर पेक्षा कमी) मध्ये Lean NOx Trap (LNT) तंत्रज्ञान वापरले जाते. हे SCR पेक्षा कमी खर्चिक असून लहान डिझेल इंजिनसाठी खूप प्रभावीपणे काम करते. यामध्ये DEF/ Adblue ऐवजी इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि कंट्रोलर बसवले असते जे उत्सर्जित वायुवर लक्ष ठेऊन त्यांचे प्रमाण नियंत्रित करते.


CNG कारवर BS 6 चा प्रभाव | Effect of BSVI on CNG Cars

बीएस 6 वाहनांमध्ये CNG च्या वापरासाठी वाहन उत्पादकांना त्यांच्या पेट्रोल इंजिनमध्ये किरकोळ बदल करावे लागतील. काही कार उत्पादकांनी देशात CNG सुसंगत BS 6 इंजिन विकसित केले आहे. देशात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहने विकल्या जाण्याआधी CNG वर चालणारी BS 6 वाहने पर्यायी आणि कमी खर्चिक ठरू शकतात. मारुती सुझुकी कंपनी त्यांची लोकप्रिय कार VITARA BREZZA CNG लवकरच BS 6 सुसंगत पर्यायामध्ये लाँच करणार आहे. त्याचबरोबर टाटा सुद्धा त्यांच्या लोकप्रिय कार अल्ट्रोज, टियागो, टिगोर आणि नेक्सॉन ला CNG मध्ये आणणार आहे.


भारत स्टेज उत्सर्जन मानक जबाबदारी | Bharat Stage Responsibility

वायु प्रदूषणाचे नियमन करण्यासाठी भारत सरकारने कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आणि स्पार्क-इग्निशन इंजिन, उपकरणे आणि मोटर वाहनांसाठी उत्सर्जन मानके (Emission Norms) तयार केली. या मानकांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution control Board) जबाबदार आहे जे 'केंद्रीय पर्यावरण, जंगल आणि वातावरण बदल' मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते.

भारतातील वाहनांमधून उत्सर्जित होणारे प्रदूषण याच सरकारी संस्थांद्वारे मोजले जाते. शहरातील प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी ते हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) वापरतात. AQI खालील घटकांच्या प्रमाणावर ठरवला जातो:

● सल्फर डायऑक्साइड (SO2).  ●नायट्रोजन ऑक्साईड (NO2).  ● कार्बन मोनोऑक्साइड (CO).  ● पार्टिक्युलेट मॅटर (PM).  ● ओझोन (OZ)


■ वाहनांद्वारे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम | Effects of Air Pollution on Health

जेव्हा प्रदूषणाची पातळी जास्त असते तेव्हा त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचे काही परिणाम पुढीलप्रमाणे:

● श्वसन आणि हृदयाचे आजार  ●  कर्करोग ● घसा आणि फुफ्फुसांचे संक्रमण, दमा  ● सतर्कता कमी होणे ● सुस्ती वाढणे  ● डोळे खाजवणे  ● अशक्तपणा ● मूत्रपिंडाचे आजार


■ प्रदूषणाच्या उच्च पातळीचे पर्यावरणावर होणारे परिणाम | Effects of high Air pollution on Environment

● जागतिक तापमानवाढ

● आम्ल पाऊस (Acid rain) आणि धुरके

● हवा, माती आणि पाणी प्रदूषण

● जीवाश्म इंधनाचा (पेट्रोल आणि डिझेल) ऱ्हास होतो

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा