संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

नवे वर्ष, नवे संकल्प, संकल्प नव-वर्षाचा : वाहनाची उत्तम काळजी घेण्याचा | Best New year resolutions ideas 2022

टिप्पणी पोस्ट करा
नवीन वर्ष 2022 सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक आहेत, अनेकांनी नवीन वर्षात काय करायचे - काय नाही करायचे याचे संकल्प (New Year's Resolution 2022) आखून ठेवलेले आहेत. आपण खूपवेळा नवीन वर्षानिमित्त संकल्प करतो आणि आपलाच संकल्प आपण स्वतःहून मोडतो किंवा कधी चुकीने मोडतो. कित्येकजण नवीन वर्षात 'आर्थिक बचतीचा' संकल्प सोडतात आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या (new year celebration) जल्लोषात, हर्षोल्हासात 1 ते 2 दिवसात मोडतात सुद्धा.

New Year's resolution ideas and how to crush them
नव्या वर्षाचे नवे संकल्प  - संकल्प कारच्या योग्य देखभालीचा


अनेकजण दरवर्षी तेच-तेच जुने आणि काही लोकप्रिय नवीन वर्षाचे संकल्प सोडतात (most popular New Year's resolution), पण तुम्ही मात्र त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करू शकता. यावर्षी तुम्हीसुद्धा एक छानसा, हटके संकल्प करू शकता ज्यामुळे तुमचा पैसा किंवा तुमचा जीव किंवा दोन्ही वाचवता येईल असा संकल्प आणि हा संकल्प आहे तुमच्या प्रिय वाहनाची चांगली देखभाल करण्‍याचा (New year Resolution of Well Maintenance of car throughout year 2022). तुमच्‍या वाहनाची योग्य देखभाल करण्‍यामुळे दोन्ही गोष्टी होऊ शकतात: पैशांची बचत आणि तुमची व परिवाराची रस्त्यावर सुरक्षितता.

कारच्या सुयोग्य देखभालीमुळे जी पैशांची बचत होईल तीच तुम्हाला तुमचा हा नव-वर्षाचा संकल्प अबाधित राखण्यास प्रोत्साहन देत राहील. 

चला तर मग जाणून घेऊया नवीन-वर्षात कारची उत्तम काळजी घेण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबद्दलची विस्तृत माहिती स्टेप-बाय-स्टेप.

•••••••••••••••••

● सर्व्हिसिंगच्या नोंदी ठेवा | Keep Servicing Records


इंजिन ऑइल बदलणे असो किंवा ब्रेक दुरीस्ती, कारच्या प्रत्येक छोट्या- मोठ्या दुरुस्तीची नोंद तुमच्याकडे असू द्या, शक्य झाल्यास 'वर्क ऑर्डर कंम्प्लिट'ची एक प्रत (कॉपी) तुमच्याकडे असू द्या. वर्क ऑर्डरची प्रत तुम्हाला वॉरंटीसाठी तर कामी येईलच या व्यतिरिक्त संपूर्ण सर्विसिंग रेकॉर्ड असल्यास वाहन विकताना संभाव्य खरेदीदारास कुठलीही शंका घेण्यास जागा देणार नाही.

● सर्विस रिमाइंडर्स | Service Reminders


कार सोबत मिळालेले 'ओनर्स मॅन्युअल' (Car's Owner's Manual) वाचा आणि त्यातील सर्विसिंगचे वेळापत्रक पाळा. काही सर्विस सेंटर्स वाहनमालकांना मोबाईलवर संदेश पाठवून पुढच्या सर्विसिंग ची आठवण करून देतात. अश्या संदेशांवर लक्ष ठेवा किंवा सर्व्हिसिंग वेळापत्रक लक्षात ठेवा. वेळेवर नियमित देखभाल केल्याने तुमचे वाहन कार्यक्षमतेने चालण्यास मदत होऊन दीर्घकाळ पैशांची बचत होते.

● इंजिनचे ट्युनिंग योग्य ठेवा | Keep Your Engine Properly Tuned


दोषपूर्ण ऑक्सिजन सेन्सर सारख्या गंभीर देखभाल समस्या असलेल्या पेट्रोल वाहनाचे मायलेज 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. एखादा मिसफायरिंग होणारा स्पार्क प्लग, कारचे मायलेज 4 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.

● इंजिन ऑइल बदला | Change The Engine Oil 


तुमच्या वाहनासाठी शिफारस केलेले योग्य ग्रेडचे आणि प्रकारचे इंजिन ऑइल वापरा आणि तुमच्या वाहन निर्माता कंपनीच्या नियमावलीनुसार ते बदला, साधारणपणे दर 12 महिन्यांनी किंवा 10 हजार किलोमीटरवर.  वेळेवर इंजिन ऑइल न बदलता दीर्घकाळ ड्रायव्हिंग केल्याने इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते. खराब इंजिन ऑइल न बदलता वाहन वापरत राहिल्यास काय काय नुकसान होऊ शकते ते इथे क्लीक करून वाचू शकता.

● एअर फिल्टर नियमितपणे तपासा आणि बदला | Check And Replace Air Filter Regularly

 
एअर फिल्टर तुमच्या इंजिनच्या ज्वलन कक्षात (combustion chamber) शुद्ध हवेचा पुरवठा करते, ज्यामुळे इंधनाचे पुरेपूर आणि योग्य ज्वलन होऊन मायलेज चांगले मिळते. तसेच एअर फिल्टर हवेतील अशुद्धीपासून आतील भागाला नुकसान होण्यापासून वाचवतात. धुळीने बुजलेला फिल्टर बदलल्याने वाहनाचा मायलेज 10 टक्क्यांनी सुधारेलच, पण ते तुमच्या इंजिनचे संरक्षणही करेल.

● टायर्सची देखभाल करा | Maintain Your Tires


प्रत्येक महिन्याला टायरमधील हवेचा दाब तपासा (check air pressure), तुमचे टायर योग्यरित्या संतुलित (well aligned and balanced) असल्याची खात्री करा, देखभाल वेळापत्रकानुसार टायर अदलाबदल करा आणि वर्षातून किमान एकदा अलाईनमेंट (Alignment) तपासा. टायरमध्ये योग्य हवेचा दाब राखल्यास वाहनाचे मायलेज जवळपास 3 टक्क्यांपर्यंत वाढतेच, त्याचसोबत टायर अधिक सुरक्षित आणि जास्त काळ टिकतात. अतिरिक्त टायर /स्टेपनी सुद्धा नियमित तपासून बघा, त्यातील हवेचा दाब योग्य करून घ्या. टायर वर असलेले कोड काय सांगतात, तुमच्या कार साठी योग्य टायर कसा निवडावा ते इथे क्लीक करून नक्की वाचा.

● वाहनातील सर्व फ्लूईड लेव्हल तपासा | Check Your Vehicle’s Fluid Levels


कारमध्ये उपयोगी असणारे विविध द्रव पदार्थ जसे की इंजिन ऑइल, गियर ऑइल (transmission oil), पॉवर स्टीयरिंग, विंडशील्ड धुण्याचे पाणी (windshield wash water), ब्रेक ऑइल (Brakes oil) आणि कूलंट (coolant) योग्यरित्या भरले आहेत याची खात्री करा.

● तयार राहा | Be Ready For Winter Tours


हिवाळ्यात दूरच्या प्रवासात काही समस्या होऊ नये किंवा झालीच तर ती दूर करण्यासाठी तयारीत रहा. त्यासाठी काही आवश्यक गोष्टी कारच्या डिकीमध्ये नेहमी असू द्या, जसे की- योग्य हवा भरलेला अतिरिक्त टायर/स्टेपनी, जॅक, बर्फ स्क्रॅपर (बर्फाळ प्रदेशात प्रवास करत असल्यास), टॉर्च, ब्लॅंकेट, अतिरिक्त कपडे, पाण्याच्या बाटल्या, मोबाईल कार चार्जर आणि काही दिवस टिकू शकेल असे पॅकिंग केलेले अन्न-पदार्थ. दूरच्या प्रवासात काय काय काळजी घ्यायची ते इथे क्लीक करून वाचू शकता, नक्कीच वाचा.

● बचावात्मक रहा | Keep Defensive While Driving


हिवाळ्यात ड्रायव्हिंग करताना नेहमी बचावात्मक रहा आणि तुमच्या टायर्सची काळजी घ्या.  गारठा वाढल्यानंतर टायर ट्रेड आणि प्रेशर आठवड्यातून किमान एकदा तरी तपासले पाहिजे. वातावरणातील दर 10℃ तापमान घट टायरमधील सुमारे 1 पाउंड प्रेशर कमी करते. तुमच्या भागात रस्त्यावर बर्फ साचण्याची समस्या असल्यास, हिवाळ्यात वापरण्यायोग्य टायर्स बसवा, जे विशेषतः गुळगुळीत रस्त्यावर पकड ठेवण्यासाठी डिझाइन केलेले असतात.

● रणनीतिक काळजी | Tactical Care


सर्व्हिस/ इंजिन इंडिकेटर, खराब इंजिन परफॉर्मन्स, अयोग्य हाताळणी, ब्रेक लवकर न लागणे किंवा इतर समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. किरकोळ समस्यांना दीर्घकाळ दुर्लक्ष करणे या समस्यांना अधिक गंभीर बनवतात जे अधिक महागात पडू शकते. उदाहरणार्थ, ब्रेक लवकर लागत नसेल तर ब्रेक पॅड तपासून बदलून घेणे स्वस्त पडते याउलट दुर्लक्ष केल्यास महागडे ब्रेक रोटर खराब होऊन खर्चात वाढ होईल.

● परिश्रम घ्या | Drive Diligently


रस्त्यावरील खराब परिस्थितीत शांत राहून कॉमन सेन्स वापरा. हिवाळ्यात रस्त्यावर धुके असल्यास तुमचा ड्रायव्हिंगचा वेग कमी करा आणि पुढल्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवा. जर तुमचे वाहन BS4 पेक्षा जुने असेल तर हिवाळ्यात सकाळी शक्यतो हेडलाईट्स सुरू ठेवा. तुम्ही बर्फात अडकल्यास इंजिन रेस करून करून टायर फिरवू नका यामुळे ते जास्त गरम होऊ शकतात आणि टायरला नुकसान होऊ शकते. तुमचे टायर फसलेले असताना त्यांना पकड घेण्यास मदत करण्यासाठी वाळू, दगड, लाकडाचा भुसा किंवा लाकडी फळ्या यासारख्या वस्तू वापरा.


● योग्यरीत्या वाहन हाताळा | Handle your Car properly


इतरांचे वाहनाबद्दल नवीन वर्षाचे संकल्प हे वाहनापेक्षा स्वतःबद्दलच जास्त काळजी करणारे असतात. Jackrabbit Start म्हणजे इंजिन सुरू करताच एक्सीलेरेटर जोरात दाबून वेगाने वाहन पळवणे, हे टाळा; अचानक अतिशय जास्त वेग वाढवल्याने इंधन (पेट्रोल/डिझेल) तर वाया जातेच शिवाय इंजिनला ताण पडतो/नुकसान होते ते वेगळेच. अचानक वेग वाढवल्याने इंधन वाया जाते तर नेहमी नेहमी अचानक ब्रेक दाबल्याने  (hard stops) ब्रेक पॅड खराब होतात, ज्यामुळे ब्रेक निकामी (brake failure) होतात.

● ऍक्टिव्ह रहा | Be Active


हिवाळ्यात वाहनातील खडखडाट, इंजिन सुरू होण्यास त्रास होणे, इंजिनचा परफॉर्मन्स कमी होणे किंवा इंजिनमधून कर्कश आवाज येणे यासारख्या जुन्याच समस्या प्रकर्षाने जाणवतात. वातावरणात गारठा वाढण्यापूर्वी किंवा कडाक्याची थंडी पडण्यापूर्वीच तुमचे वाहन / इंजिन यांत्रिकदृष्ट्या उत्तम आणि योग्य कार्य करत असल्याची खात्री करून घ्या. कारची कूलिंग सिस्टम अवश्य तपासा. वाहनाच्या एग्जॉस्ट / साइलेंसर मधून धूर (smoke coming out from silencer) येत असेल तर त्याचे कारण तपासा आणि दुरुस्ती करून घ्या. वाहन उत्पादकाच्या मेंटेनन्स वेळापत्रकानुसार कूलंट (coolant) वेळेवर बदला.

● वेळापत्रक पाळा | Follow Maintenance Chart


तुमच्या कारचे इंजिन ऑइल (car engine oil) नियमितपणे बदला. आपल्या वाहन निर्मात्याद्वारे सुचविलेल्या ग्रेडचे आणि प्रकाराचे इंजिन ऑइलच वापरा. हीटिंग, डिफॉगिंग सिस्टम योग्यरित्या कार्यरत असल्याचे देखील सुनिश्चित करा. 

● स्वच्छता ठेवा | Maintain Cleanliness


कारच्या बूट स्पेसचा (डिक्की) वापर अडगळीची खोली म्हणून करू नका, तिथे फक्त कार साठी आवश्यक वस्तू ठेवा. कारमध्ये असलेले इतर अनावश्यक वजनी सामान काढून ठेवा, कमी सामान म्हणजे कमी वजन, म्हणजेच चांगले मायलेज. तुमच्या वाहनातील कचरा आणि धूळ वेळोवेळी साफ करत राहा आणि सीट आणि कार्पेट नियमितपणे व्हॅक्यूम क्लिनिंग करा म्हणजे सीट कव्हर्स आणि इतर इंटेरिअर पार्टस लवकर खराब होणार नाही, दीर्घकाळ कार फ्रेश वाटेल. कारचा पेंट आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी कार नियमित वॉश करून पॉलिश करा, वर्षातून एकदा तरी वॅक्स लावा. आणि हो, वापरात नसेल तेव्हा कारला नेहमी झाकून ठेवा.

 •••••••••••••••••


नवीन वर्षात संकल्पा सोबतच स्वतःलाही वचन (promise) द्या की तुम्ही तुमची कार नेहमीच नीटनेटकी ठेवाल आणि कधीही कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर धावण्यास तयार राहील. संपूर्ण वर्षभर तुम्ही तुमच्या वचनाचे पालन करणार आणि हा संकल्प मोडणार नाही ह्याच अपेक्षेसोबत तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा..!

#Happy_New_Year _2022
#New_Year_Resolution_2022
#New_Year_Car_Care_Resolution

#TheAutogyan

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा