तुम्ही हा किस्सा क्वचितच ऐकला असेल किंवा वाचला असेल. तर आज आपण जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर कंपनीचा इतिहास बघूया-
तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव ऐकले आहेच. कदाचित महिंद्रा ने बनविलेल्या एखाद्-दोन वाहनाचे आपण मालक देखील असाल, परंतु आम्ही आज आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra Group) बद्दल अशी कहाणी सांगणार आहोत जी आपण यापूर्वी कधीही ऐकली किंवा वाचली नसेल.
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आज महिंद्रा अँड महिंद्रा म्हणून ओळखल्या जाणार्या कंपनीचे नाव कधीकाळी महिंद्रा आणि मोहम्मद असे होते. हो बरोबर वाचलंय तुम्ही. मग असे काय झाले की कंपनीचे नाव बदलले, किंवा अशी कोणती परिस्थिती ओढवली होती कि कंपनीचे नावच बदलावे लागले?
आजची महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra Group) कंपनीची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे 2 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. कैलाशचंद्र महिंद्रा, जगदीशचंद्र महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांनी लुधियाना, पंजाब येथे कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला ते सर्व स्टीलच्या व्यवसायात होते. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी अगदी छोटे व्यावसायिक असलेले गुलाम मोहम्मद यांचे नावही कंपनीच्या नावात जोडले गेले. याच काळात देशाच्या फाळणीची परिस्थिती उद्भवली असतानाही त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला नाही, परंतु शेवटी 1947 मध्ये देशाचे विभाजन झाले.
![]() |
| श्री. गुलाम मोहम्मद |
फाळणीनंतर मलिक गुलाम मोहम्मद यांनी पाकिस्तानची निवड केली आणि नंतर त्यांना पाकिस्तानच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. नंतर 1951 मध्ये मलिक गुलाम मोहम्मद यांची राजकीय कारकीर्द आणखी बहरली, ते पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले. आता मलिक गुलाम मोहम्मद एम अँड एम कंपनीचा हिस्सा नव्हते. तथापि, देशाच्या विभाजनामुळे व्यवसायाचेही विभाजन झाले होते. कधीकाळी एम अँड एम कंपनीचे भागीदार असलेले मलिक गुलाम मोहम्मद आता पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले होते.
![]() | |
|
बीबीसीशी (BBC News) बोलताना या कंपनीचे माजी अध्यक्ष केशव महिंद्र म्हणतात की मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तानला रवाना झाले तेव्हा महिंद्रा कुटुंबाला धक्का बसला. गुलाम मोहम्मदने महिंद्रा कुटुंबाशी कधीही आपल्या मनातील खंत किंवा हेतू सांगितला नाही, याची महिंद्रा परिवाराला खंत होती. गुलाम मोहम्मद स्वत: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक होते आणि त्यांचा दृष्टिकोनही धर्मनिरपेक्ष होता.
![]() |
| श्री. जगदीश चंद्र महिंद्रा हे तीन संस्थापक सदस्यांपैकी एक होते. |
भारत-पाकिस्तान वेगळा होऊनही महिंद्रा कुटूंबाने मलिक गुलाम मोहम्मद यांच्यासोबत आपले संबंध टिकवून ठेवले. 1955 मध्ये जेव्हा भारताच्या प्रजासत्ताक दिनाची परेड होती तेव्हा गुलाम मोहम्मद प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीला आले त्यावेळी त्यांनी पहिला फोन केशब महिंद्राच्या आजीला केला असेही महिंद्राणी जुन्या आठवणीना उजाळा देताना सांगितले. केशव महिंद्रा यांनी पाच दशके महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नेतृत्व केले.
![]() |
| श्री. कैलाशचंद्र महिंद्रा; त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत कंपनी स्थापन केली. |
अश्याप्रकारे देशाच्या स्वातंत्र्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे स्थापनेच्या ३ वर्षांनी कंपनीचे नाव महिंद्रा अँड मोहम्मद पासून महिंद्रा अँड महिंद्रा असे बदलले आणि ते आजही कायम आहे. सध्या श्री. आनंद महिंद्रा हेच कंपनीचे सर्वेसर्वा आहेत.कंपनीचे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कंपनीचे नाव बदलण्याचे खरे कारण सांगितले. ते म्हणाले की गुलाम मोहम्मद पाकिस्तानात गेले तेव्हा एम अँड एम (महिंद्रा अँड मोहम्मद)च्या नावाने बरेच स्टेशनरी साहित्य छापले गेले होते. मोहम्मद यांची कंपनीतून भागीदारी संपल्यानंतर एम अँड एम (M & M) नावाचे स्टेशनरी साहित्य बिनकामाचे झाले होते, हे साहित्य वाया जाणार होते, त्यातून आम्हाला खूप मोठे नुकसान होणार याची जाणीव झाली. आम्हा दोन्ही महिंद्रा बंधूंना पैसे वाया घालवायचे नव्हते. आम्ही विचार केला आणि शेवटी एम अँड एम म्हणजे महिंद्रा अँड मोहम्मद ची जागा महिंद्रा अँड महिंद्रा ने घेतली. याचा परिणाम म्हणजे कंपनीचे नाव तेच राहिले एम अँड एम आणि आमचे महागडे साहित्य निरुपयोगी झाले नाही.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा, प्रश्न असल्यास कमेंट मध्ये किंवा Contact Us मध्ये विचारा.
Posted By - TheAutoGyan






टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा