कोरोना (Covid-19) च्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था (Economy) कमजोर झाली आहे, परंतु तरी देखील सर्वसामान्य जनतेने घरात नवीन सदस्य रूपाने कार ला महत्व दिले. त्यामुळे या मंदीतही ऑटोमोबाईल क्षेत्र (Automobile Sector) सर्व उद्योगांवर वरचढ ठरले आहे. या मंदीत अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या कार खरेदी वर डिस्काउंट ऑफर्स किंवा इतर काही आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. सोबतच अनेक कंपन्या नवीन, स्वस्त, सुंदर, आकर्षक असे एक-से-बढकर एक मॉडेल बाजारात (Indian Market) आणत आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस प्रतीक्षा करणे उपयुक्त ठरेल.
कार प्रेमी अनेक दिवसांपासून ज्या कार्सच्या प्रतिक्षेत होते, ज्या गाड्या खूप आधी बाजारात (Market) येणे गरजेचे होते, त्यांचे लॉंचिंग कोरोनामुळे लांबणीवर पडले, परंतु त्या गाड्या आता लवकरच भारतीय बाजारात येणार आहेत. भारतात चारचाकी (four wheeler vehicles) वाहनांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी नव्या गाड्यांचे लॉंचिंग पुढे ढकलले आहे, तरीही ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहनांची बुकींग सुरूच ठेवली.
येणाऱ्या काळात यावर्षी भारतीय बाजारात दाखल होणाऱ्या कार्स...
1. Volkswagen Taigun
भारतात Volkswagen Taigun ची स्पर्धा टाटा नेक्सन, किया सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू आणि मध्यम आकाराची SUV स्कोडा कुशाक सारख्या मॉडेल सोबत होणार आहे.
2. Hyundai Alcazar
एसयूवी कारची वाढती मागणी पाहून ह्युंदाई कंपनीने नवीन अल्काजर ही SUV भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही 7 सिटर गाडी एसयूवी हुंडाई क्रेटाचे पुढील जनरेशन आहे. याचे ड्युअल-टोन इंटेरिअर या गाडीचे वेगळेपण आहे. याचा व्हीलबेस 2760 mm असून क्रेटा पेक्षा 150 mm जास्त आहे, यामध्ये 3 रांगेत एकूण 6 किंवा 7 सीट असणार आहे.
यात ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिविटी सोबत 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टेरिंग व्हिल कंट्रोल, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी, व्हॉईस रेकग्निशन, 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, 6 एअरबॅग्ज, वेहीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, आयसोफिक्स मौन्टेड सीट्स, हिल स्टार्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) ही वैशिष्ट्ये असतील. Hyundai Alcazar गाडी 17 जूनला भारतात लॉंच करण्यात येईल.
या कारची अंदाजे किंमत 13 ते 17 लाख (एक्स-शोरूम) असू शकते. भारतात याची स्पर्धा MG हेक्टर प्लस, महिंद्रा XUV 700 आणि टाटा सफारी (Tata Safari) सोबत असेल.
3. Skoda Octavia 2021
स्कोडा ऑक्टाविया सेडान कार भारतात झेक(Czech) कार निर्माता Skoda ची सर्वात लोकप्रिय कार पैकी एक आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी चौथ्या पिढीची ऑक्टाविया जागतिक स्तरावर लाँच केली परंतु भारतीय ग्राहकांना यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
नवीन ओक्टेविया 2021 मध्ये 2.0 लीटर TSI टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे जास्तीत जास्त 190 bhp पॉवर निर्माण करेल. या सह dual-clucth ऑटोमॅटिक 7 स्पीड गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. हेच इंजिन स्कोडा सुपर्ब मध्ये देखील वापरले गेले आहे. नवीन मॉडेलमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आलेला नाही.
ह्या Skoda Octavia 2021 ची अंदाजित एक्स-शोरूम किंमत 18 लाख ते 24 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. भारतात होंडा सिव्हिक, ह्युंदाई इलेंट्रा आणि टोयोटा कोरोला अल्टिस सारख्या सेडानशी ती स्पर्धा करेल.
Posted By- TheAutoGyan




टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा