क्रॅश टेस्ट (Crash Test) हि विध्वंसक टेस्टचा एक प्रकार आहे जी सामान्यत: वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये सुरक्षित डिझाइन मानके (स्टँडर्ड्स), संबंधित सिस्टम आणि घटकांसाठी हे निश्चित करण्यासाठी केला जातो कि अपघात झाला तर वाहनातील प्रवासी किती सुरक्षित राहतात किंवा वाहनाचे किती नुकसान होणार. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करून प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले जातात आणि नंतर ते सर्व गुण मिळून वाहनाला शून्य ते 5 स्टार पर्यंत मानांकन दिले जाते. क्रॅश टेस्ट मध्ये शून्य स्टार म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाची सुरक्षा तर 5 स्टार म्हणजे अतिशय चांगली सुरक्षा ते वाहन आतील प्रवाशांना पुरवू शकते.
दुचाकी वाहन विनाछप्पर असल्यामुळे अपघातात दुचाकीस्वारास सुरक्षा मिळणे खूप कठीण आहे त्यामुळे दुचाकींची क्रॅश टेस्ट (two wheeler crash test) निरर्थक ठरते. याउलट कारची क्रॅश टेस्ट (car crash test) अत्यंत महत्वाची मानली जाते.
आधी सांगितल्याप्रमाणे टेस्ट मध्ये मनुष्यासदृश पुतळे असल्यामुळे क्रॅश किंवा अपघातदरम्यान याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर किती नुकसान होऊ शकेल याचा अंदाज घेतला जातो. पुतळ्याच्या डोक्याला, मानेला, छातीला, गुडघ्याला, मांडीला, पोटरीवर आणि पावलांवर किती, कुठे आणि कसा मार लागला याचा अभ्यास करून टेस्ट मध्ये गुण दिले जातात. यासाठी पुतळ्यांमध्ये मध्ये असलेल्या सेन्सर आणि ट्राएक्सियल-एक्सेलेरोमीटरची मदत घेण्यात येते. या गुणांच्या आधारे शून्य ते 5 स्टार रेटिंग ठरवले जाते.
क्रॅश टेस्ट मध्ये कारवर वेगवेगळ्या प्रकारच्या धडक देऊन चाचण्या केल्या जातात.
क्रॅश टेस्ट चे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत (Crash Test Types) -
१. फ्रन्टल- इम्पॅक्ट टेस्ट (Frontal Impact test):
२. मॉडरेट ओव्हरलॅप टेस्ट (Moderate Overlap Tests):
ह्या टेस्टमध्ये कारचा पुढचा काही भाग काँक्रीट भिंतीवर किंवा वाहनावर आदळल्या जातो. म्हणजे कार्सचा थोडासाच भाग एकमेकांवर ओव्हरलॅप होतो. हि एक अत्यंत महत्वाची टेस्ट आहे. यामध्ये धडकेचा प्रभाव हा फ्रंटल इम्पॅक्ट टेस्ट प्रमाणेच असतो, परंतु कारच्या एका छोट्या भागावर मर्यादित. या प्रकारची चाचणी USA IIHS, EuroNCAP , ऑस्ट्रेलॅशियन NCAP आणि ASEAN NCAP द्वारे घेण्यात येतात.
३. स्मॉल ओव्हरलॅप टेस्ट (Small Overlap Tests):
यामध्ये कारच्या बॉडीचा एक छोटासा भाग खांब किंवा झाडासारख्या वस्तूवर आदळला जातो. ही सर्वात आवश्यक असलेली चाचणी आहे कारण ती कोणत्याही वेगात कारच्या बॉडीवर सर्वात जास्त भार देते. यामध्ये कारच्या समोरील भागाच्या १५ - २०% भागावर हि टेस्ट केली जाते.
४. साईड इम्पॅक्ट टेस्ट (Side Impact Tests):
कारच्या कोणत्याही एका बाजूवर एखादे वाहन आदळल्यास (side impact) किंवा वाहन एखाद्या ठोस वस्तूवर आदळल्यास होणाऱ्या अपघातांमध्ये प्राणहानी होण्याची शक्यता किंवा प्रमाण जास्त असते. याचे कारण म्हणजे कारच्या बाजूवर (डाव्या/उजव्या) धडक बसल्यास कारची बाजू चुरगळून किंवा चोळामोळा होऊन धडकेची पूर्ण ऊर्जा शोषून घेण्यास कमी वाव असते. त्यामुळे कारमधील प्रवासी गंभीर जखमी होण्याचा धोका असतो. म्हणून, साईड इम्पॅक्ट टेस्ट एक महत्वाची टेस्ट ठरते.
५. पोल इम्पॅक्ट टेस्ट (Pole Impact Tests):
हि एक अत्यंत कठीण अशी टेस्ट आहे ज्यामध्ये अत्त्युच्च बल (force) वाहनाच्या बाजूवर कमी जागेत लादले जाते.
६. रोल-ओव्हर टेस्ट्स (Roll-over Tests):
यामध्ये कारचे पिलर्स जे छताला जोडलेले असतात, त्यांची मजबूतीची टेस्ट केल्या जाते. एखाद्या अपघातात जेव्हा कार उलटते किंवा कोलांट्या (रोल-ओव्हर) मारत जाते त्यावेळी कारचा छप्परचा भाग आणि पिलर्स चुरगळून (Crush) आतील प्रवाशी जखमी आणि मृत्युमुखी पाडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अलीकडेच स्थिर क्रश टेस्ट (Static Crush Test) ऐवजी डायनॅमिक रोलओव्हर टेस्ट (Dynamic roll-over test) करण्याचे प्रस्तावित आहे.
७. रोडसाइड हार्डवेअर क्रॅश टेस्ट (Roadside hardware crash tests):
या टेस्टमध्ये सुनिश्चित केले जाते कि रस्त्यांवरील बॅरियर्स (अडथळे), संरक्षक कठडे, बॅरिकेट्स, लाइट पोल, सूचना बोर्ड आणि तत्सम यंत्रे वाहनातील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा पोचवू शकणार नाहीत.
८. जुनी विरुद्ध नवीन वाहने (Old versus new):
बर्याचदा जुन्या आणि मोठ्या आकाराच्या कार नवीन आणि आकाराने लहान असलेल्या कारच्या विरुद्ध धडकावल्या जातात. कधी-कधी दोन सारख्याच पण वेगवेगळ्या पिढीतील (old Vs New generation) कार टेस्ट केल्या जातात. या टेस्टमधून जुन्या आणि नवीन कारमध्ये क्रॅश टेस्टनुसार झालेल्या सुधारणांची तुलना केल्या जाते.
९. संगणक मॉडेल्स (Computer model):
क्रॅश चाचण्यांच्या खर्चामुळे, अभियंते अनेकदा थेट चाचण्या घेण्यापूर्वी त्यांचे वाहन आणि डिझाईन सुधारण्यासाठी संगणकचलित मॉडेल्सचा वापर करून अनेक सिम्युलेटेड क्रॅश चाचण्या चालवतात. महागड्या कार कंपन्या थेट क्रॅश टेस्ट करण्यापूर्वी संगणकीय कार मॉडेलचे सिम्युलेशन करून क्रॅश टेस्टसाठी येणारा मोठा खर्च वाचवतात. या टेस्टमधून मिळणारे निकाल हे थेट क्रॅश टेस्ट मधून मिळणाऱ्या निकालाशी मोठ्या प्रमाणात मिळतेजुळते असतात.
१०. स्लेड टेस्टिंग (Sled Testing):
सुरक्षा चाचणीचे (Crash Test) जगभरातील प्रमुख सेवा प्रदाते-
1. युनायटेड स्टेट्स नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम United States New Car Assessment Program (U.S. NCAP)
2. इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी Insurance Institute for Highway Safety (IIHS)
3. ऑस्ट्रेलिशियन नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम Australasian New Car Assessment Program (ANCAP)
4. जपान नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम Japan New Car Assessment Programme (JNCAP)
5. युरोपियन नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम European New Car Assessment Programme (Euro NCAP)
6. कोरियन नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम Korean New Car Assessment Programme (KNCAP)
7. दक्षिण आशियायी नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम New Car Assessment Program for Southeast Asia (ASEAN NCAP)
8. ग्लोबल नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम Global New Car Assessment Programme (Global NCAP)
9. भारतीय नवीन वाहन सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रम Bharat New Vehicle Safety Assessment Program (BNVSAP)







Good information in Marathi to increase awareness about car safety. Keep it up bro. I hope Indian people will prefer safety over mileage and price of car. - AsaliGyan
उत्तर द्याहटवा