संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Engine Oil Grade and Engine Oil types | इंजिन ऑइलचे ग्रेड आणि प्रकार. आपल्या वाहनासाठी ऑइल कसे निवडावे ?

३ टिप्पण्या

कार सर्विसिंगमध्ये वापरली जाणारी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे इंजिन ऑइल. Car engine oil हे मुख्य लुब्रिकेंट्सपैकी एक आहे ज्याचा इंजिन चालनामध्ये मोठा सहभाग आहे. ऑइल इंजिनला  थंड ठेवते आणि आतल्या फिरणाऱ्या घटकांना योग्य लुब्रिकेशन देऊन घर्षणविरहित ठेवते. या इंजिन ऑईल्सचे (engine oil for car) काय -काय फायदे आहेत ते आधी बघूया- 

engine oil for car

१. लुब्रिकेशन (वंगण) प्रदान करते (Provides lubrication)

इंजिनमध्ये इंधन (पेट्रोल/डिझेल) ज्वलन होत असताना म्हणजेच इंजिन सुरु असताना ऑइल इंजिनच्या विविध घटकांमधील घर्षण कमी करते. इंजिनमधील विविध पार्ट्सवर ऑईलचा पातळ थर तयार होतो त्यामुळे इंजिनचे भाग एकमेकांवर घासल्या जात नाहीत. अशा प्रकारे इंजिन ऑइल आतल्या पार्टसची झीज (घर्षणामुळे होणारी) कमी करते.

 २. ऍसिड निष्क्रिय करते (Neutralizes Acids)

इंधन ज्वलन प्रक्रियेदरम्यान, इंधन आणि इतर लुब्रिकेंट्सचे ऑक्सिडायझेशन झाल्याने ऍसिडस्  तयार होतात.  इंजिन ऑईल या ऍसिड्सना निष्क्रिय करतात.

 ३. गाळ (स्लज) साफ करतो (Cleans Sludge)

इंजिन ब्लॉक स्वच्छ करण्यासाठी आणि जुन्या ऑइल्समुळे तयार होणारा गाळ साफ करण्यासाठी इंजिन ऑइल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.  जर इंजिनमधला गाळ योग्यरित्या काढला गेला नाही तर इंजिनच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.

 ४. गंज आणि ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते (Inhibits Rust and Oxidation)

इंजिन तेलाचे आणखी एक कार्य म्हणजे गंज रोखणे.  मोटर ऑइल  सिलिंडर ब्लॉक्सला गंजण्यापासून वाचवते.

तर आता आपल्याला माहित आहेच  की इंजिन ऑइल इंजिन सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. परंतु आपणास माहित आहे का, की सर्व इंजिन एकसारख्याच इंजिन ऑईलने कार्य करू शकत नाहीत?

होय, वेगवेगळ्या इंजिनांना सामान्यपणे कार्य करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या इंजिन ऑईल्सची आवश्यकता असते.  कार उत्पादक आपल्या कारच्या विविध मापदंडांवर आधारित इंजिन ऑईलची शिफारस करतात. आपल्या कारला आवश्यक असलेल्या इंजिन ऑईलची ग्रेड (श्रेणी) देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. एक चांगले ऑइल  इंजिनचे आयुष्यमान, कार्यक्षमता आणि मायलेज देखील वाढवते.

इंजिन ऑइल पुढे २ भागांमध्ये विभागल्या जाते. एक म्हणजे ऑइल ग्रेड (श्रेणी) आणि दुसरा ऑईलचा प्रकार.

Engine oil type and Engine oil Grade

आपल्या वाहनासाठी ऑइल निवडताना या दोन्ही गोष्टी म्हणजेच ऑईलचा ग्रेड आणि प्रकार माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनांची सर्व्हिसिंग बाहेर करताना अनेकदा मेकॅनिक त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्याजवळ योग्य ऑइल उपलब्ध नसल्यास जे उपलब्ध असेल ते ऑइल टाकून मोकळे होतात. पण अशाप्रकारे कोणतेही ऑइल वापरल्यास आपल्या इंजिनचे आयुष्य सोबतच मायलेज सुद्धा कमी होऊ शकते.
तर, आता पाहूया इंजिन ऑईलच्या ग्रेड आणि प्रकारांबद्दल (types of engine oil) विस्तृत माहिती.

A. इंजिन तेलाचे ग्रेड | Engine oil grade

तुम्ही इंजिन ऑईलचा डब्यांवर 5W30, १०W३०, 15W40, 10W40 (engine oil grades list) याप्रकारचे काहीतरी वाचले असेलच. हेच आहेत ऑईलचे वेगवेगळे ग्रेड. यालाच ऑइल व्हिस्कॉसिटी ग्रेड देखील म्हटल्या जाते जे कमी आणि उच्च तापमानात लुब्रिकंट्सची (ऑईल्सची) तरलता आणि कार्यक्षमता सुचवतात. इंजिन ऑईल्सना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागल्या गेले आहेत. SAE (Society of Automotive Engieers) ने ऑईलच्या घट्टपणाच्या (Viscosity) आधारावर त्यांचे वर्गीकरण केले आहे.  व्हिस्कोसिटी म्हणजे द्रवपदार्थाचे अंतर्गत घर्षण व्यक्त करणारे प्रमाण. सामान्य तापमानावर वेगवेगळ्या इंजिन ऑईलमध्ये वेगवेगळी व्हिस्कॉसिटी असते. तापमान वाढल्यास ऑईलचा घट्टपणा कमी होतो (ऑइल पातळ होते) आणि तापमान घटल्यास (हिवाळ्यात) ऑईलचा घट्टपणा वाढत जातो.

कमी व्हिस्कॉसिटी ग्रेडचे ऑइल जास्त पातळ असते ज्यामुळे ते इंजिनमध्ये सुलभरीत्या संचारित (circulate) हौते. याउलट, जास्त व्हिस्कॉसिटी ग्रेडचे ऑइल तुलनेने थोडे घट्ट असते, त्यामुळे या ऑईलचा प्रवाह इंजिनमध्ये थोडा स्लो असतो ज्यामुळे इंजिनमधल्या पार्ट्सवर ऑईलचा थर योग्यरितीने तयार होऊन त्यांना घर्षणापासून संरक्षण मिळते.

इंजिन ऑइलवर तापमानाचा परिणाम होत असल्याने, त्याच्या  ग्रेडवरून आपल्याला गरम आणि थंड वातावरणात योग्य ऑईलचा वापर आणि circulationची माहिती मिळते. उदाहरणार्थ:

  • कमी तापमानात, वाहन लवकर सुरु होऊन त्यातील ऑइल circulation सुलभ होण्यासाठी कमी   व्हिस्कोसिटी ग्रेड असलेले तेल निवडणे चांगले. 
  • इंजिनच्या उष्ण आणि अधिक संवेदनशील भागामध्ये उच्च ग्रेडचे मोटर ऑइल अधिक कार्यक्षम ठरेल. उच्च ग्रेडचे ऑइल घट्ट असल्यामुळे ते इंजिनच्या आतल्या भागावर संरक्षणात्मक थर तयार करेल, ज्यामुळे भागांमधील घर्षण रोखून त्यांची झीज कमी होईल.

या लेखामध्ये आपण विविध प्रकारचे वाहन ऑइल ग्रेड (engine oil grade) आणि त्याचा अर्थ काय ते पाहू.

1. मोनोग्रेड ऑइल | Monograde oil

मोनोग्रेड ऑइल कमी तापमान श्रेणीवर वापरली जातात आणि सामान्यतः जुन्या वाहनांसाठी तयार केली जातात. वाहन वापरात असताना वर्षाच्या वेळेनुसार/ ऋतूनुसार  या प्रकारचे तेल दोन प्रकारात मोडते. 

engine oil for car
 

थंड, हिवाळ्याच्या महिन्यांसाठी SAE 0W, 5W, 10W, 15W, 20W आणि 25W मोटर ऑइल SAE ने सुचवले आहेत. येथे W हा विंटर म्हणजेच हिवाळा दर्शवतो, म्हणजे हे तेल थंड वातावरणात इंजिन सुरळीत चालण्यास योग्य आहे. त्यांचा व्हिस्कॉसिटी ग्रेड कमी आहे, म्हणजे ते विशेषतः पातळ आहेत.  प्रत्येक श्रेणी दिलेल्या तपमानावर (-10 ° C ते -35 ° C पर्यंत, ग्रेडनुसार) त्याच्या चिकटपणाद्वारे परिभाषित केली जाते. थंड वातावरणात लुब्रिकेंट जेवढे पातळ असेल तेवढे इंजिन मधील ऑइल-पंप ते ऑइल सुलभरीत्या इंजिनमध्ये सर्कुलेट करू शकेल.

उष्ण महिन्यांत आपल्या इंजिनसाठी, उच्च व्हिस्कोसिटी ग्रेड असलेले मोटर तेल निवडणे चांगले आहे. या ऑइल ग्रेडसाठी W अक्षर वापरल्या जात नाही म्हणजेच  SAE20, 30, 40, 50 किंवा 60 मोटर ऑईल्स. उच्च तापमानात  उच्च व्हिस्कोसिटी ग्रेड (जाड तेल) हे सुनिश्चित करेल की इंजिन योग्यरित्या संरक्षित केले गेले आहे.

ऋतूनुसार मोनोग्रेड ऑइल (Monograde oil) बदलावे लागते.

2. मल्टीग्रेड तेल | multigrade oil

मल्टीग्रेड ऑइल त्याच्या गुणधर्मामुळे आज सर्वात लोकप्रिय ऑइल बनले आहेत. हे ऑइल बाह्य तापमानाचा जास्त फरक ना पडता सर्व ऋतू आणि तापमानामध्ये  प्रभावीपणे काम करतात, कारण मोनोग्रड oilपेक्षा ते तापमानाच्या फरकाने कमी प्रभावित होतात.

मल्टीग्रेड ऑईलच्या (multigrade oil) कॅनवर 'W' च्या दोन्ही बाजूस एक संख्या असते जसे 0W30, 5W30, 5W40, 10W30 किंवा 10W40 जे वातावरणातील  तापमान बदलांचा सामना करण्याची ऑईलची क्षमता दर्शवते.

मोनोग्रेड ऑईलप्रमाणेच येथेही  'W' चा अर्थ Winter (हिवाळा) आहे.  या ‘W' पूर्वीची संख्या हिवाळ्यातील व्हिस्कोसिटी ग्रेड दर्शवते - म्हणजे कमी तापमानातही इंजिन सुरु करण्याची क्षमता.  हि संख्या जितकी कमी असेल तितकी इंजिनला थंड वातावरणात सुरू करणे सोपे होईल, म्हणून वेगवान स्टार्ट-अपसाठी, आपण हिवाळ्यात अधिक पातळ ऑइल निवडले पाहिजे

W नंतरची  संख्या उच्च तापमानात मोटर ऑइल व्हिस्कोसिटी ग्रेड दर्शवते. उच्च श्रेणी म्हणजे इंजिन पार्ट्सचे योग्य संरक्षण. कारण उच्च तापमान असेल तर घट्ट असलेले ऑइलचा घट्टपणा कमी होऊन सर्व पार्टस वर एकसमान थर पसरतो आणि इंजिनची कार्यक्षमता वाढते.

 

B. इंजिन तेलांचे प्रकार | Types of Engine Oil

आपण पुढे जाण्यापूर्वी आणि कोणतेही इंजिन ऑइल  खरेदी करण्यापूर्वी, आपल्या हॅचबॅक, सेडान किंवा SUVला  कोणत्या प्रकारचे ऑइल आवश्यक आहे ते जाणून घ्या.  आपल्या कारमध्ये काय टाकतोय हे समजून घेणे आवश्यक आहे. ऑइल सुनिश्चित करते की इंजिन किती स्मूथ आणि कार्यक्षमतेने चालेल.

सर्वसाधारणपणे, इंजिन ऑईलचे तीन प्रकार आहेत: मिनरल (Mineral Oil), सेमी-सिंथेटिक (Semi -synthetic) आणि फुल-सिंथेटिक (Full-Synthetic) ऑइल.

 १. मिनरल ऑइल | Mineral Oil

सर्व आधुनिक आणि उच्च प्रतीच्या इंजिन ऑइलचे मूळ हे मिनरल ऑइल मधेच आहे. मिनरल ऑइल हे मूलत: पेट्रोल, डिझेलप्रमाणेच कच्च्या तेलापासून (Crude oil) प्रक्रिया करून वेगळे काढलेले तेल आहेत जे विस्तृत तापमानात कार्य करण्यासाठी विविध प्रक्रियेतून गेलेले असते. आपण शोरूम मधून नवीन वाहन (बाईक किंवा कार) घेतो त्यावेळेस त्यामध्ये मिनरल ऑइलच (mineral oil) दिलेले असते. आजकाल फक्त जुन्या वाहनांमध्ये आणि मोटारसायकलमध्येच मिनरल ऑईल्सचा वापर होतो.

MIneral oil

मिनरल ऑइलची (mineral oil) सर्वात मोठी समस्या अशी आहे की ते कमी लुब्रिकेशन देतात आणि उष्णतेपासून कमी संरक्षण देतात. तसेच, ते थंड तापमानात अत्यंत अकार्यक्षमतेने कामगिरी करतात. असे ऑइल इंजिन मध्ये असल्यास लांबच्या प्रवासात इंजिन गरम झाल्यास इंजिन बंद पडण्याची समस्या उदभवते.  मिनरल ऑइलला वारंवार बदलण्याची आवश्यकता असते.  ते २००० ते २५००० किमी पेक्षा जास्त टिकत नाहीत.

ज्या ऑईलच्या डब्यावर/कॅनवर Synthetic oil/ Semi Synthetic Oil / Synthetic Base/ Technosynthese oil यापैकी काहीही छापलेले नसेल आणि इतर ऑइलपेक्षा स्वस्त असेल तर ते ऑइल मिनरल ऑइल समजावे.

२. सेमी-सिंथेटिक ऑइल | Semi synthetic oil

हे ऑइल मिनरल ऑइल आणि फुल सिंथेटिक ऑइलचे (Full Synthetic oil) मिश्रण असते. सेमी सिंथेटिक ऑइल मध्ये २० ते ३० % पर्यंत फुल सिंथेटिक ऑइल आणि उर्वरित मिनरल ऑइल मिश्रीत असते. सेमी सिंथेटिक ऑईल्स मिनरल ऑईलची परवडणारी किंमत आणि फुल सिंथेटिक ऑईलची कामगिरी प्रदान करते. फुल सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम ऑईलचा रूपात या ऑईलमध्ये काही केमिकल्स आणि इस्टर्स मिश्रित केली जातात जे इंजिनला घर्षण आणि गाळ साचण्यापासून उत्तम सुरक्षा प्रदान करतात. तसेच मिनरल ऑईलचे ऑक्सिडेशन कमी करून ऑईलचे (semi Synthetic oil) आयुषमान वाढवतात ज्यामुळे या प्रकारचे इंजिन ऑइल मिनरल ऑइलच्या तुलनेत तीनपट संरक्षण प्रदान करते.

Semi synthetic oil

सिंथेटिक ऑइलची जोड मिळाल्यामुळे त्याचा चिकटपणा वाढते आणि इंजिन तेलाची उच्च तापमान आणि घर्षणाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढते. मिनरल ऑइल च्या तुलनेत सेमी सिंथेटिक ऑईलचे आयुष्य जास्त असते. सेमी सिंथेटिक ऑईल्स साधारणतः 5000 ते 5500 किमी पर्यंत उत्तम चालतात.

३. पूर्ण सिंथेटिक इंजिन ऑइल | Full Synthetic Oil

 इंजिन ऑइलमध्ये हे एक सर्वोच्च ऑइल आहे. हे ऑइल पूर्णतः कृत्रिमरित्या बनवलेले असून उत्कृष्ट इंजिन संरक्षण  आणि अधिक मायलेज प्रदान करते.

 मिनरल ऑईल्सवर अत्यधिक रासायनिक प्रक्रिया करून त्याचे गुणवर्धन करून मूळ मिनरल ऑइल पेक्षा अधिक कार्यक्षम आणि उत्कृष्ट असे फुल सिंथेटिक ऑइल बनवले जाते. या प्रक्रियेत मिनरल ऑईलच्या अशुद्धी पूर्णतः दूर केल्या जातात. सोबतच या ऑईलमध्ये काही केमिकल्स (additives), सरफॅक्टअंट्स (Surfactants) आणि सिन्थेटिक इस्टर्स (esters) मिसळले जातात ज्यामुळे ऑईलचा चिकटपणा वाढतो, ऑक्सिडेशन कमी होऊन ऑइल लवकर जळत नाही, इंजिनला आतमधून साफ ठेवतात आणि इंजिनमध्ये गाळ साचू देत नाही.  सिंथेटिक ऑईलचे रेणू एकसमान आकारात अगदी सुसंगत असतात ज्यामुळे इंजिनला उत्कृष्ट लुब्रिकेशन मिळते. कमी किंवा उच्च तापमानात किंवा असामान्य ताणतणावाखाली फुल सिंथेटिक ऑईल्स (Full Synthetic oil) उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात.

Full synthetic oil

फुल सिंथेटिक ऑईलचे आयुष्मान हे इतर दोन ऑइलपेक्षा खूप जास्त असते. हे ऑइल जवळपास १०,००० ते ११,००० किमी पर्यंत उत्तमरीत्या कार्य करतात.

मोटर ऑइल आपल्या कार इंजिनसाठी अपरिहार्य आहे. ते सुनिश्चित करते की वाहन शक्य तितके चांगल्या स्थितीत कार्य करेल.  तर आपण कोणते  इंजिन ऑइल निवडावेहे आपल्या कारवर तसेच आपण कोठे चालवितो  यावर अवलंबून आहे. तथापि, आपल्या कारसाठी कार निर्माता कंपनीद्वारे सुचवलेले ऑइल निवडणे योग्य ठरते.

कृपया लक्षात घ्या की वाहनांची आवश्यकता भिन्न असू शकते म्हणून योग्य व्हिस्कोसिटी ग्रेडसाठी आपल्या कारच्या हँडबुकचा सल्ला घ्या. तसेच, आपल्या कारकडे लक्ष द्या आणि वेळोवेळी oil बदला.
 
Posted By - TheAutoGyan.com

Related Posts

३ टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा