संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Mahindra XUV 700 Specifications, Price, Mileage and Launch date | महिंद्रा XUV700 वैशिष्ट्ये, किंमत, मायलेज आणि लाँच तारीख

टिप्पणी पोस्ट करा
New Mahindra XUV700 images, Specs, Price, Mileage & launch date.

महिंद्राने त्यांची बहुप्रतिक्षित SUV Mahindra xuv700 चा टीजर लाँच केला आहे. त्यामधून आपल्याला XUV700 ची अगदी ऍडव्हान्स झलक पाहायला मिळते. तर बघूया XUV700 ची पूर्ण माहिती.

Mahindra XUV 700 Platform | बांधणी

Mahindra XUV700, कोडनेम W601. हीच ती महिंद्रा W601 जी आधी New XUV500 नावाने मार्केट मध्ये येणार होती. परंतु आता तिला अधिकृतपणे XUV700 ह्या नावाने मार्केटमध्ये आणल्या गेले. नवीन महिंद्रा XUV700 ची रचना जुन्या XUV500 प्रमाणेच आहे ज्यामध्ये - आडवे इंजिन मांडणी, मोनोकोक बॉडी (चेसिस आणि बॉडी एकसंध जोडलेले) आणि एकूण तीन ओळीमध्ये ७ सीट्स अशी डिझाइन असलेले.

 

Mahindra XUV 700 specs
Mahindra XUV 700 Front Grill look

Mahindra XUV 500 लॉन्च झाल्यापासून दशकभरात तिची विक्री कमी-कमी होत गेली, परंतु XUV नावाला अजूनही चांगली ब्रँड व्हॅल्यू आहे. तरीपण W601 च्या उत्तम फीचर्स आणि XUV 500 पेक्षा जास्त सुधारित असल्यामुळे महिंद्राने त्याला XUV700 नामकरण केले. त्यामुळे दोन गोष्टी साध्य केल्या; प्रथम, त्याने XUV700 ला अधिक प्रीमियम स्थान दिले आहे आणि दुसरे, XUV 500 चे नवीन व्हर्जनसाठी अजूनही जागा शिल्लक आहे. XUV500 प्रमाणे, प्लॅटफॉर्म फ्रंट-व्हील-ड्राइव्ह (FWD) आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) पर्यायांसाठी सुसज्ज केले आहे.
 
XUV 700 ची बांधणी एका नवीन प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन मोनोकॉक बॉडी XUV500 च्या तुलनेत 80% अधिक मजबूत आहे, त्याचे कारण म्हणजे "स्पॉट वेल्ड्स"ची वाढवलेली संख्या आणि मजबूत ऍढेसिव्ह बॉंडिंग. मोनोकॉक बॉडीमुळे XUV700 चे वजन आधीच्या XUV 500 पेक्षा खूप कमी आहे. एकट्या इंजिनचे वजन पूर्वीच्या इंजिन पेक्षा सुमारे 70 किलो कमी आहे. XUV700 चे वजन 1,960kg-2,040kg या रेंजमध्ये आहे. याचे टेलगेट (मागचा दरवाजा) हा प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणाने बनवलेला आहे, जे कदाचित भारतात कारमध्ये पहिल्यांदाच वापरले गेले असावे. मागच्या बाजूने अपघात झाल्यास हा दरवाजा धातूच्या दरवाज्याप्रमाणे डेंटिंग-पेंटिंग करून दुरुस्त करता येणार नाही, तर तो पूर्ण नवीन बदलावा लागेल.

Mahindra XUV700 Technology | तंत्रज्ञान

 
महिंद्रा XUV700 मधे प्रगत “व्हिस्टियन” इन्फोटेनमेंट सिस्टम (Visteon) आणि Advanced Driver Assistance Systems (ADAS) दिलेली आहे, जी या श्रेणी आणि किमती मध्ये याआधी कोणत्याही कारमध्ये दिलेली नाही. यामध्ये इन-बिल्ट एलेक्सा सपोर्ट पण देण्यात आला आहे.


MAhindra XUV 700 specifications


Mahindra XUV700 Exterior | एक्सटेरियर

XUV700 एकदम मस्कुलर बॉडी आणि stylish लुक मध्ये पाहायला मिळेल. महिंद्रा XUV700 च्या लोअर व्हेरिएंट मधे 17-इंच स्टील किंवा डायमंड कट ऍलोय व्हील, तर टॉप व्हर्जन मध्ये 18 इंच आकाराचे डायमंड कट ऍलोय व्हील्स उपलब्ध असेल.

 

MAhindra XUV 700 specifications
Mahindra XUV700 Diamond cut Alloy wheels

XUV700 ची लांबी 4695 मिमी, रुंदी 1890 मिमी आणि उंची 1755 मिमी आहे जी XUV500 च्या तुलनेत 110 मिमी लांब परंतु 30 मिमी ठेंगणी आहे, तर रुंदीला आधीसारखीच आहे.



Mahindra XUV 700 specifications
Mahindra XUV700 Muscular Body
 
XUV700 चा व्हीलबेस 2750 मिमी म्हणजेच आधीपेक्षा 50 मिमी जास्त आहे. या कारचे बॉनेट सुद्धा अत्यंत पिळदार असून नवीन ग्रिल डिझाइन मध्ये आकर्षक उभे स्टील बार बघायला मिळेल. याशिवाय XUV700 सोबतच महिंद्राचा नवीन लोगो देखील बघायला मिळेल.


Mahindra XUV700 Interior | इंटेरिअर 

इंटेरिअर मध्ये एक अतिशय सुव्यवस्थित आणि प्रीमियम केबिन मिळते. XUV700 5 आणि 7 सीट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यात मोठ्या आरामदायक सीट्स, प्रीमियम कुशन आणि अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. यात अलेक्सा सपोर्ट आणि अड्रेनॉक्स नावाचे एक पूर्णपणे कनेक्ट असेलेले कार तंत्रज्ञान आहे, त्यामधून व्हॉईस कमांड देता येते. इतर प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये सोनी कंपनीचे 12-स्पीकर्स, एक सबवूफर, 3D सराउंड साउंड सिस्टम, 6-वे पॉवर ऍडजस्टेबल सीट; मेमरी आणि वेलकम फंक्शनसह आणि एक पॅनोरॅमिक सनरूफ जे केवळ टॉप-एंड व्हेरिएंट्समधेच उपलब्ध असेल.

 

Mahindra XUV 700 images

 

Mahindra XUV700 चे मुख्य आकर्षण एक डिस्प्ले पॅनल आहे जो जवळपास अर्ध्या डॅशबोर्डवर पसरलेला आहे. यात मर्सिडीज प्रमाणे 10.25 इंच आकाराचा टॅब्लेट सेंट्रल टचस्क्रीन आणि पुर्णतः डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे जे प्रीमियम दिसते आणि ग्राहकांना पाहता क्षणी आवडेल. बेसिक व्हर्जन वगळता इतर सर्व व्हर्जन मध्ये हेच डिस्प्ले पॅनल असेल तर बेसिक व्हर्जनमध्ये लहान 8.0-इंच इन्फोटेनमेंट युनिट आणि 7.0-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वेगवेगळे असेल. या पॅनल खालीच मोबाईल साठी एक वायरलेस चार्जरची सुविधा देखील देण्यात आली आहे.

 

MAhindra XUV 700 specifications

इतर खास वैशिष्ट्यांमध्ये एअर-प्युरिफायर सिस्टीमसह ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, डे अँड नाईट IRVM, Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी पर्यायांचा समावेश आहे.

Mahindra XUV700 Engine | इंजिन 

महिंद्रा थार मध्ये वापरण्यात आलेले अगदी नवीन इंजिन 2.2-लिटर mHawk डिझेल आणि mStallion 2.0 टर्बो-पेट्रोल हीच इंजिने नवीन XUV700 मध्ये वापरली गेली आहेत. परंतु XUV700 मध्ये या इंजिनचा पॉवर वाढवण्यात आला आहे. डिझेल व्हेरिएंट्समध्ये 155hp ते 185hp एवढा पॉवर मिळतो तर 2.0 टर्बो-पेट्रोल इंजिन 200 hp पॉवर तयार करते.

पेट्रोल वर्जनमध्ये 2.0-लीटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल जे 5000 rpm वर 197 bhp पॉवर आणि 1750 ते 3000 rpm वर 380 Nm चा पीक टॉर्क उत्पन्न करते. इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. डिझेल व्हर्जनमध्ये 2.2-लीटर, फोर-सिलिंडर mHawk इंजिन असेल जो तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (१) बेस व्हेरियंटसाठी ते 3750 RPM वर 153 bhp पॉवर आणि 1500 ते 2800 RPMवर 360 Nm टॉर्क देते आणि सहा-स्पीड मॅन्युअल गिअर मध्ये उपलब्ध असेल. (२) दुसरे डिझेल इंजिन 3500 RpM वर 185 bhp पॉवर आणि 1600 ते 2800 आरपीएमवर 420 Nm टॉर्क देते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध असेल. (३) तर तिसऱ्या (optional) पर्यायांमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) ट्रान्सफर केससह ऑटोमॅटिक इंजिन 1750 ते 2800 rpm वर 450 Nm टॉर्क उत्पन्न करतो.

पेट्रोलमध्ये प्रकारामध्ये कोणतेही ड्राईव्ह मोड पर्याय दिलेला नसून डिझेलमध्ये मात्र तीन ड्राईव्ह मोड आहेत - झिप, झॅप, झूम (Zip, Zap & Zoom). Zip मोडमध्ये आरामशीर ड्रायव्हिंगसाठी पॉवर 155hp पर्यंत कमी केला जाते तर Zap आणि Zoom मोडमधे पूर्ण 185 bhp पॉवर मिळते. या दोघांमध्ये फरक फक्त एवढाच की Zoom मध्ये थ्रॉटल रिस्पॉन्स जलद आहे.

Mahindra XUV700 Mileage | मायलेज

महिंद्राने मायलेज बद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही परंतु त्यांचा म्हणण्यानुसार XUV700 ही या कारच्या रेंजमध्ये सर्वोत्तम मायलेज देणारी कार असेल.

Mahindra XUV700 Safety | सुरक्षा

Mahindra xuv700 crash test झाल्याचे विडिओ बघायला मिळतात परंतु Safety Rating अद्याप जारी करण्यात आले नाही, तरी महिंद्रा कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकतो. याचे कारण म्हणजे महिंद्राची XUV300, ज्याला 5-स्टार GNCAP रेटिंग मिळाले आहे आणि भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे.

XUV700 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फ्रंट, साइड आणि कर्टन एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX सीट माउंट्स, हिल होल्ड/डिसेंट फंक्शन आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (DSP) सारखी वैशिष्ट्ये आहेत. धडकेपासून बचावासाठी समोर आणि मागच्या बाजूला कॅमेरे व रडार दिलेले आहेत सोबतच ऑटोनॉमस एमरजन्सी ब्रेक (AEB) सुद्धा आहेत.

 

Mahindra xuv700 crash test

इतर सुरक्षा वैशिष्ट्ये ड्रायव्हर ड्रॉवसिनेस डिटेक्शन (ड्राइवरला झोप येत असल्यास कार अलर्ट देते), ऑटो हाय बीम असिस्ट (Auto High beam Assist) आणि बूस्टर हेडलाइट्स (Booster headlights) आहेत जे 80 km/hr किंवा जास्त वेगात वाहन असल्यास हेडलाईटचा प्रकाश वाढवतात. ABS आणि ESP सोबतच गुडघ्यासाठी एक एअरबॅग मिळून एकूण 7 एअरबॅग (7 Airbags) उत्तम सुरक्षा प्रदान करतील.
 

Mahindra XUV700 specifications

ADAS प्रणाली रस्त्यावरील दिशानिर्देश आणि सुचनाबोर्ड वाचून ड्रायव्हरला सूचना देते.


Mahindra XUV 700 specs

  


Mahindra XUV700 Price | किंमत

महिंद्रा XUV700 भारतात लॉन्च करण्यात आली आहे ज्याची किंमत
MX पेट्रोल वर्जनसाठी ₹ 11.99 लाख, तर
MX डिझेल वर्जनसाठी ₹ 12.49 लाख,
AX3 पेट्रोल वर्जनसाठी ₹ 13.99 लाख, तर
AX5 पेट्रोल वर्जनसाठी ₹ 14.99 लाख रुपये आहेत. (सर्व किमती एक्स-शोरूम).
उर्वरित डिझेल आणि टॉप मॉडेल AX7 व्हेरियंट पुढील महिन्यात (September 2021) भारतात विक्रीसाठी येतील आणि त्यांची किंमतही स्पर्धात्मक असेल.


Mahindra XUV700: Launch Date | उपलब्ध तारीख


नवीन Mahindra XUV700 यावर्षी सप्टेंबर (Sept. 2021) मध्ये लाँच करण्यात येईल.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा