संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Tata Punch images, launch date, price, specs and More | टाटा पंच एसयुव्ही - चित्रे, किंमत, लाँच डेट, वैशिष्ट्ये...

टिप्पणी पोस्ट करा

टाटा पंच - किंमत, फोटो, मायलेज आणि वैशिष्ट्ये

टाटा पंच ही टाटाची नवीन मायक्रो-एसयूव्ही (Tata Punch Micro SUV)  असेल.  कंपनीने या SUV चा फोटो रिलीज केला असून ही कार यापूर्वी Tata HBX (H2X, Hornbill) म्हणून Auto Expo 2020 मध्ये प्रदर्शित केली होती. Tata HBX ही एक कन्सेप्ट कार होती. नवीन Tata Punch Micro SUV ही या ब्रँडची Nexon नंतर सर्वात छोटी SUV ठरली आहे. पंच पूर्वी प्रदर्शित केलेल्या HBX संकल्पनेसारखीच दिसते परंतु काही वैशिष्ट्ये थोडी कमी केली आहेत. Auto Expo 2020 मध्ये संकल्पना (कन्सेप्ट) कार म्हणून प्रदर्शित केल्यानंतर लवकरच प्रोडक्शन सुरू होऊन मार्केट मध्ये उतरणारी ही पहिलीच कार ठरेल.
TATA PUNCH IMAGES
TATA PUNCH Images (right Exterior)

TATA PUNCH : Exterior | एक्सटेरियर

टाटा पंच ही Altroz ​​मध्ये वापरलेल्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असून Altroz पेक्षा कमी व्हीलबेस आहे तसेच कारची लांबी एकूण 3850 mm च्या आसपास असण्याची अपेक्षा आहे.  पंचच्या नोज एरियामध्ये (Nose area) हॅरियर सारखेच वरच्या बाजूस आकर्षक DRL दिलेले असून हेडलॅम्प च्या बाजूला ट्राय-एरो (tri-arrow) डिजाईन ठळकपणे दिसून येते. मस्कुलर बंपर्समुळे कार खूपच दणकट आणि मजबूत असल्याचा अनुभव येतो. नवीन टाटा पंच मध्ये हरियरचा लुक, अल्ट्रोजची 5 स्टार गोल्ड स्टँडर्ड सुरक्षा आणि नेक्सन फॅमिली मध्ये बसणारी पूर्ण वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच ह्या कारला कॉम्पॅक्ट SUV किंवा मायक्रो SUV म्हटल्या गेले. 
 
TATA Punch images
TATA Punch Images (exterior left)


टाटा मोटर्सने जारी केलेल्या फोटोवरून याची पुष्टी केली जाऊ शकते की समोरचा बंपर आणि बॉडी क्लॅडिंग HBX संकल्पनेतून आणली गेली आहे. Tata Punch ची ग्रील डिझाइन नेक्सन सारखी ग्लॉसी ब्लॅक असून हेडलॅम्प्स हरियर सारखे आहेत. पुढच्या बंपरमध्ये टाटाची सिग्नेचर Y डिझाईन (tri-arrow design) आहेत आणि सोबतच फॉग लॅम्प्स देखील आहे. 
 
TATA Punch images
TATA Punch Images: Concept Car Exterior (Concept Car HBX)

 
फ्लोटिंग इफेक्ट देणारे ड्युअल-टोन रूफ कलर मध्ये ही कार उपलब्ध असेल. कन्सेप्ट कारच्या प्रदर्शनावेळी टाटाने सांगितल्या प्रमाणे "पंच" मध्ये व्हील साईझ कमी केलेला आहे जो अंदाचे 15 किंवा 16 इंच असण्याची शक्यता आहे. टाटाने मात्र अद्याप "पंच"च्या मागील बाजूची डिजाईन दाखवली नाही मात्र याचे टेलगेट कन्सेप्ट कारमध्ये दाखवल्याप्रमाणे असण्याची पूर्ण  शक्यता आहे.
 
Tata punch specifications
Tata punch Concept Tailgate image (Concept Car HBX)
 
TATA PUNCH Price
Tata Punch Images  (Concept Car HBX)

Tata Punch Price
Tata Punch Images  (Concept Car HBX)

■ TATA PUNCH : Interiors | इंटेरिअर

टाटा पंच च्या इंटेरिअर चे फोटो/ लुक अद्याप जारी केला नसला तरी तो HBX प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. डॅशबोर्ड डिझाईन HBX प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि चौकोनी एअर व्हेंट्स आहेत.  पंचमध्ये थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, AC कंट्रोल्स आणि अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ज्यामध्ये डिजिटल टॅकोमीटर आणि ऍनालॉग स्पीडोमीटर असू शकते.
 
Tata punch mileage
Tata punch steering wheel (Concept Car HBX)
 
यामध्ये बटण स्टार्ट, क्रूज कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल, फ्लोटिंग डिस्प्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, ड्रायव्हरच्या सीटसाठी 8-way अडजस्टमेंट, कप होल्डर्स सह रिअर आर्मरेस्ट आणि पूर्ण ब्लॅक कलर स्कीम केबिन यांचा समावेश आहे.
 
Tata punch mileage
(Concept Car HBX) 

Tata punch Launch date
Tata punch interior images (Concept Car HBX)

  

■ TATA PUNCH : Engine | इंजिन

Tata Punch 1.2-लीटर क्षमतेच्या 2 वेगवेगळ्या पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. लोअर व्हर्जनमधे नैचुरली एस्पिरेटेड इंजिन असेल जे टियागो आणि टिगोर मध्ये आहे आणि 84 bhp पॉवर व 113 Nm चा टॉर्क उत्पन्न करते. TAta Punch 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स मध्ये असू शकते. दरम्यान, अल्ट्रोज i-Turbo 1.2-लीटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनसह टॉप मॉडेल येण्याची अपेक्षा आहे.

■ TATA PUNCH : Price | किंमत आणि प्रतिस्पर्धी

वैशिष्ट्ये आणि लूकनुसार Altroz ते Harrier च्या दरम्यान बसणारी Tata Punch ची किंमत मात्र लाँच केल्यावर 5 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. Tata Punch लूक, specs आणि किमतीच्या बाबतीत फोर्ड फ्रीस्टाइल, महिंद्रा KUV 100, मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंदाई कॅस्पर सारख्या कार्सला टक्कर देईल. त्याचप्रमाणे निसान मॅग्नाईट आणि रेनॉल्ट Kiger सारख्या एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट एसयूव्हीला सुद्धा Tata Punch धोकादायक ठरेल.
 

■ TATA PUNCH : Launch Date | लाँच तारीख

Tata Punch यावर्षी दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात फेस्टिव्ह ऑफर्स सह लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा