संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Bharat Series to be applied Nationwide | नवीन भारत सिरीज वाहन क्रमांक प्रणाली लवकरच

टिप्पणी पोस्ट करा

Bharat Series: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकारने देशातील नवीन वाहनांसाठी "भारत मालिकेची" (BH series) अधिसूचना जारी केली आहे. या नवीन कायद्यामुळे वाहने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रांसफर (पासिंग) करण्याची समस्या दूर होईल आणि वाहन मालकांना हे सोयीचे ठरेल. या नियमानुसार नवीन वाहनांना BH Series मध्ये नोंदणी करावी लागेल, जे सध्यातरी ऐच्छिक आहे. म्हणजेच, वाहन मालकाला हवे असल्यास, तो त्याच्या वाहनासाठी BH मालिका घेऊ शकतो. याचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना आणि कर्मचाऱ्यांना होईल जे नोकरीच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत राहतात.

Bharat series (BH series) अंतर्गत नोंदणी क्रमांक घेऊन, त्या वाहन मालकांना दुसऱ्या राज्यात गेल्यास नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही आणि जर नवीन प्रणाली अंतर्गत वाहन मालक दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाला, तर तो सहजपणे आपले जुने रजिस्टर्ड वाहन दुसऱ्या राज्यात चालवू शकतो. BH series नोंदणी करण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल.


BH Series Number Plate
Bharat Series Number Plate Image


Bharat series (BH series) च्या नवीन वाहन नोंदणी कायद्यात वाहने ट्रान्सफर करण्याची गरज भासणार नाही. संरक्षण कर्मचारी (Army, BSF etc), केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्था ज्यांचे 4 किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये आहेत, त्यांचे कर्मचारी Bharat series मध्ये त्यांची वैयक्तिक वाहने रजिस्टर करू शकतात.


■ आता तुम्ही दुसऱ्या राज्यात गेल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज राहणार नाही- 

सध्याच्या नियमानुसार कोणताही वाहन मालक आपले वाहन नोंदणीकृत राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात जास्तीत जास्त फक्त 1 वर्षासाठी ठेवू शकतो आणि 12 महिन्यांनंतर पुन्हा एकदा वाहन नोंदणी करावी लागते.  BH series सुरू करण्यामागे हा उद्देश आहे की, वैयक्तिक वाहनांचे ट्रान्स्फर अगदी सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय करता आले पाहिजे. हा नियम त्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल ज्यांना वारंवार बदली होण्याची जास्त शक्यता असते आणि त्यांची वाहने इतर राज्यांत घेऊन जावी लागतात. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 47 नुसार, व्यक्तीने ज्या राज्यात वाहन नोंदणीकृत केले आहे त्या राज्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ वाहन ठेवण्याची परवानगी नाही. नवीन BH series नियम लागू झाल्यास ही कटकट कायमची संपुष्टात येईल.


■ सध्या लागू असलेला वाहनांच्या कराचा नियम | Current Tax System

सध्या, आपण नवीन वाहन विकत घेतो त्यावेळेस त्यावर रोड टॅक्स भरतो जो पुढच्या 15 वर्षांसाठी असतो. म्हणजे सध्याच्या नियमानुसार आपण आगाऊ रोड टॅक्स (road tax in advance) भरतो. जर आपण आपले वाहन दुसऱ्या राज्यात नेले तर तेथे पुन्हा नोंदणी करावी लागेल.  उदाहरणार्थ, जर एखादे वाहन दोन वर्षच जुने असेल आणि दुसऱ्या राज्यात नोंदणी करायची असेल तर उर्वरीत 13 वर्षांसाठी पुन्हा कर भरावा लागेल. म्हणजे आधी भरलेला 15 वर्षांचा कर + नंतर भरावयाचा 13 वर्षांचा कर असा जवळपास दुप्पट भुर्दंड सध्याच्या कायद्यामुळे बसतो. आधीचे  पैसे (15 वर्षांचा रोड टॅक्स) परत मिळवण्यासाठी आपण ज्या राज्यामध्ये वाहन मूळतः नोंदणीकृत केले होते तेथूनच दावा करणे आवश्यक आहे आणि ही परराज्यात बदली झालेल्यांसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे.


■ Bharat series नंतर कोणत्या वाहनावर किती कर लागेल

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने BH series मध्ये आपले वाहन नोंदणीकृत केले, तर त्याला 10 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांसाठी 8%, 10-20 लाख रुपये किंमतीच्या वाहनांसाठी 10% तर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 12% टॅक्स द्यावा लागेल. डिझेल वाहनांसाठी 2% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल तर इलेक्ट्रिक वाहनांवर करामध्ये 2% सूट असेल.


■ भारत सिरीजचे फायदे  | BH series Benefits

1. सध्या खाजगी वाहनांच्या नोंदणी दरम्यान 15 वर्षांचा रस्ता कर भरावा लागतो.  इतर राज्यात गेल्यावर त्यांना पुन्हा 10 किंवा 12 वर्षांसाठी रस्ता कर भरावा लागतो, तसेच पुन्हा नोंदणीच्या प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतर त्यांना पहिल्या राज्यात वाहन आधी नोंदणीकृत होते तिथे रकमेचा दावा करणे आवश्यक आहे. या Bharat series प्रणालीचा उद्देश हा सर्व त्रास दूर करणे हाच आहे.

2. वेगवेगळ्या राज्यांमधील वेगळ्या कराचा त्रास संपेल. 

3. BH series लागू झाल्यानंतर या लोकांना त्यांच्या वाहनासाठी पुन्हा पुन्हा नोंदणी क्रमांक घ्यावा लागणार नाही. संपूर्ण भारतात एकसमान नंबर प्रणाली लागू होईल.


■ नंबर प्लेट कशी असेल | BH series Number Plate

सध्या वापरात असलेल्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट प्रमाणेच पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगात नंबर छापलेला (emboss) असेल. हे नवीन नंबर BH ने सुरू होईल आणि त्यानंतर नोंदणीच्या वर्षाचे शेवटचे दोन अंक आणि नंतर पुढील क्रमांक असे त्याचे स्वरूप असेल.


■ Bharat Series क्रमांक स्वरूप | BH series Format

नवीन भारत सिरीज मध्ये नंबर प्लेटवर YY BH #### XX अश्याप्रकारे नंबर बघायला मिळेल.

ज्यामध्ये सुरुवातीला YY म्हणजे नोंदणी वर्षाचे शेवटचे 2 आकडे असेल,  BH म्हणजे Bharat Series, # म्हणजे 4 अंकी क्रमांक असेल जो  0000 ते 9999 या दरम्यान असेल, आणि शेवटी XX म्हणजे AA पासून तर ZZ पर्यंतचे इंग्रजी अक्षरे असतील. उदाहरणार्थ- 2021 साली विकत घेतलेल्या गाडीचा क्रमांक 21 BH 1234 AB अश्याप्रकारचा असेल.


■ भारत सिरीज कधीपासून | BH Series Apply Date

ही नवीन भारत सिरीज नंबर प्रणाली येत्या  15 सप्टेंबर 2021 पासून संपूर्ण देशात लागू केली जाईल. 


Posted By - the Auto Gyan

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा