संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

How does an electric vehicle and their braking system work | इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे ब्रेक कसे कार्य करतात. भारतातील इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांच्या किमती.

टिप्पणी पोस्ट करा

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की गेल्या दशकात कारच्या संख्येत जवळपास 500% वाढ झाली आहे. कारची ही वाढ जगभरातील पर्यावरण प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. इलेक्ट्रिक कार पेट्रोल/डिझेल कारच्या तुलनेत पर्यावरणास अनुकूल आणि कमी प्रदूषण करणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत (Electric Cars Sale) हळूहळू वाढही होत आहे. इलेक्‍ट्रीक वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांची विक्री गेल्या तीन वर्षात चार पटींनी वाढली आहे. 

 

Electric vehicle working
Electric Car Charging Station

■ इलेक्ट्रिक कार आणि पेट्रोल कार दरम्यान तुलना

इलेक्ट्रिक मोटर ही इलेक्ट्रिक वाहनाला (Electric Vehicles) चालवते, तर इंधनावर चालणारी कार पेट्रोल/डिझेल किंवा CNG hybrids IC Engine वर  चालते. 

इलेक्ट्रिक कारमध्ये (Electric Cars) फक्त इलेक्ट्रिकल पार्ट्स असल्याने ते इतर कारपेक्षा दुरुस्त करणे खूप सोपे आहे. इलेक्टरीक कारची शक्ती (पॉवर) पेट्रोल कारपेक्षा कमी असते. परंतु ड्रायव्हिंग करताना त्यांच्यातील फरक सांगणे अशक्य आहे. ड्राइविंग करत असताना पेट्रोल/डिझेल गाड्यांच्या इंजिनचा आवाज खूप जास्त असतो, त्याउलट इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी स्मूथ आणि अगदी शांत असतात.

electric scooter, Battery scooter

EV हे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) कारसारखे असतात.  त्यामध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे मोड असतात. जेव्हा आपण वाहन गिअरमध्ये टाकतो आणि ऍक्सेलरेटर वर दाब देतो तेव्हा पुढील गोष्टी घडतात:

● इलेक्ट्रिक मोटरसाठी  बॅटरीच्या DC विद्युतला इन्व्हर्टरद्वारे AC (अल्टर्नेटिंग करंट) मध्ये  रूपांतरित केली जाते.

● ऍक्सेलरेटर पेडल कंट्रोलरला सिग्नल पाठवते जे AC विद्युतची फ्रिक्वेन्सी बदलून इलेक्टरीक मोटरचा म्हणजेच वाहनाचा वेग ऍडजस्ट करते.

● ही मोटर चाकांना जोडलेली असते त्यामूळे चाकांना गती मिळते.

● जेव्हा ब्रेक दाबले जातात किंवा कारचा वेग कमी करण्यासाठी ऍक्सेलरेटर सोडतो, तेव्हा हीच मोटर अल्टरनेटर सारखी कार्य करते आणि वीज निर्माण करते, जी बॅटरीमध्ये परत साठवली जाते. 

 

■  इलेक्ट्रिक वाहनाची ब्रेकिंग सिस्टिम (Regenerative Braking system) 

जेव्हा इलेक्ट्रिक वाहनाचे ब्रेक दाबले जाते किंवा ऍक्सेलरेटर कमी केल्या जाते त्यावेळेस वाहनातील इलेक्ट्रिक मोटर "जनरेटर" म्हणून कार्य करते. हे जनरेटर वाहनाची गतिज ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते आणि पुन्हा बॅटरी रिचार्ज करते. याला "रिजनरेटिव्ह ब्रेकिंग" म्हणतात. 

 

■  इलेक्ट्रिक वाहनाचे मुख्य घटक:

● विद्युत मोटर (Electric Motor)   ● इन्व्हर्टर (Inverter)   ● बॅटरी (Battery)

● बॅटरी चार्जर (Battery Charger)  ● नियंत्रक (Controller)  ● चार्जिंग केबल  (Charging Cable)


electric car working principle
Electric Car Components (Image Credit: circuitdigest.com)

1) विद्युत मोटर (Electric Motor)- 

मिक्सर, ज्यूसर, वॉशिंग मशिन, कूलर, ड्रायर ई. प्रत्येक गोष्टीत इलेक्ट्रिक मोटर्स वापरल्या जातात.  ह्या मोटर विश्वासार्ह आणि खूप टिकाऊ असतात. इलेक्ट्रिक वाहनातील या मोटर्स AC विद्युत वापरतात.


2) इन्व्हर्टर (Inverter)-   

इलेक्ट्रिक कारमध्ये असलेले इन्व्हर्टर हे आपल्या घरी वापरल्या जाणाऱ्या इन्व्हर्टर प्रमाणेच आहे जे बॅटरीतील DC पॉवरला AC power मध्ये रूपांतरित करते. याच AC पॉवरवर वाहनातील मोटर चालते. इन्व्हर्टर AC पॉवरची फ्रिक्वेन्सी (50 किंवा 60 Hz) बदलून वाहनांच्या गतीमध्ये बदल करू शकतो. तसेच मोटरची शक्ती (power) किंवा टॉर्क वाढवू किंवा कमी करू शकते.


3) बॅटरी (Battery) - 

बॅटरी ही इलेक्ट्रिक कारच्या ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे. बहुतेक इलेक्ट्रिक वाहने लिथियम-आयन बॅटरी (Li-Ion Battery) वापरतात. EV मध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी अनेक छोट्या सेल्स (cells) पासून बनलेली असते. लिथियम आयन बॅटरीमध्ये उर्जेची घनता (energy density), दीर्घ आयुष्य आणि जास्त विद्युत घनता (power density) असते. त्यामुळे Li-ion बॅटरीची चार्जिंग जास्त वेळ पुरते. सुरक्षित आणि कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी Li-ion बॅटरी सुरक्षित तापमान आणि व्होल्टेज रेंजमध्ये वापरल्या पाहिजेत.

बॅटरीचे आयुष्य जास्त असल्यास खर्च कमी होतो. यावर आणखी एक उपाय म्हणजे दोन बॅटरी पॅक आलटून-पालटून वापरणे. लिथियम-आयन बॅटरीचा वापर आणि पर्यायाने उत्पादन वाढल्यामुळे किंमती सतत कमी होत आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होण्यास मदत होत आहे.


4) बॅटरी चार्जर (Battery Charger) 

बॅटरी चार्जर आपल्या घरातील उपलब्ध AC विद्युतला DC पॉवरमध्ये रूपांतरित करून बॅटरीमध्ये जमा करते ज्याला आपण बॅटरी चार्ज होणे म्हणतो. हे चार्जर चार्जिंग रेट ऍडजस्ट करून बॅटरी सेल्सचा (battery cells) व्होल्टेज स्तर नियंत्रित करते तसेच बॅटरीच्या तापमानाचे निरीक्षण करेल ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य लवकर घटणार नाही. 

 

5) नियंत्रक (Controller)- 

कंट्रोलर (इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर) हे वाहनाच्या मेंदूसारखे आहे जे वाहनातील सर्व घटना, सिग्नल्स व्यवस्थापित करते.  हे बॅटरीचा चार्ज रेट नियंत्रित करते, ऍक्सेलरेटर कडून येणारे सिग्नलवर प्रक्रिया करून वेग कमी-जास्त करते तसेच ब्रेक्स दाबल्यानंतर तयार होणारी विद्युत परत बॅटरीमध्ये जमा करण्याचे कार्य देखील कंट्रोलर पार पाडते.

 

6) चार्जिंग केबल  (Charging Cable) - 

EV सोबत निर्माता कंपनीकडून एक चार्जिंग केबल (अडॅप्टर सोबत) पुरविली जाते जी घरी किंवा बाहेर चार्जिंग स्टेशन वर वाहन चार्ज करण्यासाठी वापरता येते. काही फास्ट चार्जिंग स्टेशन वर वेगळी आणि उच्च कॅपॅसिटीची चार्जिंग केबल उपलब्ध असते तिथे आपण कारसोबत मिळालेली केबल वापरू शकत नाही. 

 

■ इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे फायदे:

1) कमी वायू प्रदूषण: 

EV मध्ये कोणत्याही प्रकारचे इंधन ज्वलन होत नाही त्यामुळे ही वाहने वातावरणात प्रदूषण करणारे वायू सोडत नाहीत.  त्यामुळे पारंपारिक IC इंजिनवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ते पर्यावरणाचे कमी नुकसान करतात.

 

electric bike, scooter
Credit: Unilever.com

2) कमी ध्वनी प्रदूषण: 

इलेक्ट्रिक वाहनामध्ये कोणतेही अल्टरनेटर, बेल्टस आणि IC इंजिन नसते त्यामुळे ही वाहने शांतपणे चालते, वाहन चालवताना आवाजाची पातळी पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवर चालणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत खूपच कमी असते.  त्यामुळे ध्वनिप्रदूषण खूप कमी होते.

3) उच्च कार्यक्षमता: 

इलेक्ट्रिक वाहनाची इंधन (विद्युत) कार्यक्षमता खूप जास्त आहे. प्रति लिटर पेट्रोल/ डिझेल पेक्षा EV प्रति वॅट (किंवा किलोवॉट) विजेवर जास्त अंतर धावते. एकूणच, इलेक्ट्रिक-वाहन पेट्रोल किंवा डिझेल वाहनापेक्षा अधिक कार्यक्षम आहे.

4) कमी देखभाल खर्च: 

IC इंजिनप्रमाणे जास्त देखभाल (मेंटेनन्स) करावा लागत नाही. इंजिन ऑइल आणि सर्व्हिसिंगचा खर्च पण नाही. 


5) कमी इंधन आणि ऑपरेटिंग खर्च :

कोणतेही पेट्रोल /डिझेल/ CNG सारखे इंधन वापरण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे भेसळयुक्त किंवा किमतीपेक्षा कमी पेट्रोल/डिझेल मुळे होणारे कोणतेही नुकसान नाही. 


EV कमी खर्चिक आणि प्रदूषण कमी करणारे असले तरी त्यांना काही मर्यादा आहेत. 


■ इलेक्ट्रिक वाहनांच्या मर्यादा:

1) उच्च किंमत: इलेक्ट्रिक-वाहनांचे उत्पादन अद्याप पूर्णपणे व्यावसायिक स्तरावर झालेले नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केट मध्ये अजूनही पाहिजे तशी प्रतिस्पर्धा नाही त्यामुळे किमती अजूनही जास्तच आहेत. बहुतेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स साठी आपल्याला चीन, जपान, व्हिएतनाम सारख्या दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ही वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक कारपेक्षा महाग असतात.


2) कमी रेंज: 

इलेक्ट्रिक-वाहनाची रेंज म्हणजे ते एकवेळ चार्ज केल्यावर किती अंतर पार करू शकते, ही रेंज किलोमीटर मध्ये मोजल्या जाते. बॅटरी तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे त्यामुळे काही कार 350 ते 400 किमी ची रेंज देतात. तथापि, या वाहनांची रेंज अजूनही पारंपरिक पेट्रोल/डिझेल वाहनांच्या बरोबरीची नाही. तसेच, यापैकी काही वाहने केवळ कमी-वेगात चालवण्यासाठी उपयुक्त आहेत.

 

3) चार्जिंग स्टेशनची कमतरता:

आपल्या देशात पारंपरिक कारसाठी आवश्यक पेट्रोल किंवा डिझेलचे स्टेशन/पंप जागोजागी उपलब्ध आहेत. याउलट लांबच्या प्रवासात चार्जिंग संपल्यास इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन अगदी बोटांवर मोजण्याइतपत उपलब्ध आहेत. त्यामुळे ३०० ते ४०० किमीची रेंज असणारे वाहन सुद्धा लांबच्या प्रवासासाठी वापरताना खूप विचार करावा लागतो किंवा हि वाहने सध्यातरी लांबच्या प्रवासासाठी निरुपयोगी आहेत असेच म्हणावे लागेल.

वीजेवर चालणारी वाहने हेच आता वाहन उद्योगाचे भवितव्य असल्याने वाहन उद्योगाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. 


सध्या भारतात उपलब्ध असलेले Electric Vehicles
➨ काही लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्स (Electric cars) आणि त्यांची किंमत

1 . Hyundai Kona Electric ➮ Rs. 23.79 -23.98 Lakh
2 . Tata Nexon EV ➮ Rs. 13.99-16.85 Lakh
3 . MG ZS EV  ➮ Rs. 21- 24.18 Lakh
4 . Tata Tigor EV  ➮   Rs. 10.58 -10.89 Lakh
5. Mahindra e2o PLUS  ➮  Rs. 7.48-11.49 lakh
6. Mahindra E Verito  ➮  Rs.10.15 -10.49 Lakh

7. Audi e-tron   ➮  Rs. 99.99 Lakh - 1.17 Crore
8. Jaguar I-Pace   ➮   Rs. 1.05 - 1.12 Crore
9. Mercedes-Benz EQC   ➮   Rs. 1.06 Crore
10.  Strom Motors R3   ➮   Rs. 4.50 Lakh

➨ काही लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक्स (Electric Bikes & Battery scooter) आणि त्यांची किंमत 

1. Revolt Bike RV400  ➮  Rs. 90,799
2. TVS iQube Electric  ➮  Rs. 1.00 Lakh
3. Bajaj Chetak  ➮  Rs. 1.00 - 1.15 Lakh
4. Ather 450X  ➮ Rs. 1.13 - 1.32 Lakh
5. Ola S1  ➮  Rs. 85,099 - 1.10 Lakh
6. Hero Electric Atria  ➮  Rs. 63,640
7. Ultraviolette F77  ➮  Rs. 3.00 Lakh
8. Hero Electric Photon  ➮  Rs. 71,440
9.  Joy e-bike Wolf   ➮  Rs. 40,000
10. Simple One   ➮  Rs. 1.09 Lakh
11. Okinawa iPraise+   ➮   Rs. 99,708
12. Hero Electric NYX   ➮  Rs. 62,954

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा