संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

कार आणि बाईकच्या सायलेन्सर मधून धूर येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय | Reasons of smoke from car and bike engine

टिप्पणी पोस्ट करा
जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल कि “सायलेन्सर मधून काळा धूर येत आहे” किंवा “वाहन खूप धूर सोडत आहे, काय करावे?” तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहेत. तर या लेखामधे आपण पाहणार आहोत कार / बाईकच्या सायलेन्सर मधून निघणाऱ्या धुराचे प्रकार (bike exhaust smoke) आणि धूर येण्याची कारणे.
 
white smoke from exhaust on startup, white smoke from engine exhaust, black smoke from engine exhaust, blue smoke from engine exhaust, blue smoke from silencer, black smoke from silencer,
water vapours (वाफ) from exhaust system

कार इंजिन खराब होण्याच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे कारच्या एक्झॉस्ट मधून येणारा धूर (white smoke from exhaust on startup). सर्वात आधी आपण एक्झॉस्ट स्मोक (exhaust smoke) म्हणजे काय ते समजून घेऊया. नावाप्रमाणेच, “एक्झॉस्ट स्मोक” हे इंजिनमध्ये इंधन ज्वलनातून तयार होणारा धूर पुढे सायलेन्सर मध्ये असलेल्या घटकांशी (कॅटॅलीस्ट सोबत) प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे बाय-प्रॉडक्ट आहे. सोप्या भाषेत, सायलेन्सरमधील कॅटॅलीस्टद्वारे धुरातील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नैट्रोजन ऑक्साईड (NOx) यांचे पाणी आणि नायट्रोजन मध्ये रूपांतर होते आणि उष्णतेमुळे या पाण्याचे बाष्पीभवन होऊन एक्झॉस्ट /tailpipe मधून वाफ बाहेर पडते. परंतु, कधीकधी आपण वेग-वेगळ्या रंगाचा असामान्य धूर (बहुतेक वेळा पांढरा, निळा आणि काळा धूर) बघतो तेव्हा समजून जावे की इंजिनमध्ये काहीतरी गडबड आहे. इंजिन सुरू करताना आणि सुरू झाल्यानंतर थोड्या काळासाठी पांढरा किंवा वाफेसारखा धूर बाहेर पडतो.

कारमधून निघणारा धूर काय सांगते? | Smoke From Car Exhaust

सामान्यतः इंजिन मधून 3 प्रकारचे म्हणजे 3 वेगवेगळ्या रंगांचे धूर बाहेर पडतात आणि त्या प्रत्येक रंगाचा एक विशिष्ट अर्थ असतो. प्रत्येक रंग इंजिनमधील विशिष्ट प्रॉब्लेम दर्शवते. जर इंजिन सदोष किंवा खराब स्थितीत असेल तर गाडी सुरू असेपर्यंत सतत सायलेन्सर मधून काळा धूर (Black Smoke from Silencer), पांढरा धूर (White Smoke) किंवा निळसर धूर (Blue smoke) बाहेर पडतो. अश्यावेळी या धुराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याचे कारण जाणून घेण्यासाठी इंजिनची तपासणी करावीच लागेल. इंजिन सुरू केल्यानंतर काळा धूर का दिसतो, पांढरा धूर का येतो किंवा निळा धूर (smoke from exhaust on startup) काय सूचित करते याचा विचार करावाच लागेल.
 

1. सायलेन्सर मधून पांढरा धूर | White smoke from Engine


आधी सांगितल्याप्रमाणे धूर वेगवेगळ्या रंगांचे असू शकते. वाहन सुरु केल्यावर जेव्हा आपण थोडे एक्सेलरेटर दाबतो तेव्हा वाहन जास्त धूर सोडते (white smoke from exhaust when accelerating). तसेच, दीर्घकाळ कार किंवा बाईक बंद स्थितीत उभी राहिल्यास एक्झॉस्ट सिस्टिम (सायलेन्सर) मध्ये कंडेन्सेशन (दव जमते) होते. इंजिन सुरू झाल्यावर उष्णतेमुळे या दवाचे रूपांतर वाफेत (बाष्पीभवन) होऊन ती सायलेन्सर मधून बाहेर पडते, यावेळेस पांढरा धूर निघाल्यासारखे वाटते. ही वाफ किंवा पांढरा धूर 15 ते 30 सेकंद पर्यंत निघताना दिसेल आणि हे अगदी नॉर्मल आहे. 
 
white smoke from engine, Blue smoke from tailpipe, Black smoke from exhaust, blue smoke from bile exhaust, White smoke from Bike exhaust, smoke from car exhaust, black smoke from car exhaust, black smoke from tailpipe, white smoke from tailpipe, blue smoke from tailpipe of car
एक्झॉस्टमधून पांढरा धूर निघताना

हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात रात्रभर वाहन उभे राहून सकाळी सुरू करतानाही असा पांढरा धूर थोड्या वेळासाठी निघतो. हाच पांढरा धूर जर खूप वेळ निघत असेल आणि फक्त वाहन बंद केल्यानंतरच बंद होत असेल तर हे इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाल्याचे दर्शवते.

जर वाहन पांढरा धूर सोडत असेल तर सिलेंडर हेड खराब किंवा सिलेंडरचे कूलिंग जॅकेट क्रॅक (cracked cooling jacket) झाले असण्याची शक्यता आहे. इंजिनच्या बॉडीमध्ये फिरणारे कुलंट सिलेंडरचे कूलिंग जॅकेट, हेड किंवा एखाद्या गास्केट क्रॅकमधून कंबशन चेंबरमध्ये (इंधन जिथे जळते ते सिलेंडर / ब्लॉक) प्रवेश करत असेल तर एक्झॉस्टमधून पांढरा धूर निघतो.

Coolant leakage into combustion chamber, Blue smoke from tailpipe, Black smoke from exhaust, blue smoke from bile exhaust, White smoke from Bike exhaust, smoke from car exhaust, black smoke from car exhaust, black smoke from tailpipe, white smoke from tailpipe, blue smoke from tailpipe of car
चित्र : इंजिन आणि कुलंट जॅकेट (इंजिनचा साईड व्यू)

अशावेळी सर्वात आधी कुलंटची लेव्हल तपासावी (Check Coolant level), जर वारंवार कुलंट कमी होत असेल तर धुराचे अर्धे निदान इथेच लागले. यानंतर इंजिनची पूर्ण तपासणी करणे, सिलेंडर हेड जास्त खराब झाल्यास बदलणे, सिलेंडर हेड गॅस्केट बदलणे, शक्य असल्यास क्रॅक दुरुस्त करणे, हेडची पोजिशन तपासणे यासारख्या गोष्टी करून घ्या.

जोपर्यंत इंजिनमधली समस्या दूर होत नाही, तोपर्यंत इंजिन न वापरणे चांगले, जेणेकरून इंजिन सुरक्षित राहील. या कुलंट मध्ये पाणी मिश्रीत असते त्यामुळे ज्यावेळेस हे कंबशन चेंबर मध्ये प्रवेश करते त्यावेळी इंधन ज्वलनासोबत काही मिश्रण जळते तर त्याचा काही भाग इंजिनमध्ये पिस्टन आणि हेड व्हॉल्व्हवर जमतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पिस्टन, पिस्टन रिंग्स आणि व्हॉल्व्ह खराब होऊन तुटू शकतात आणि त्याच्या दुरुस्तीचा मोठा खर्च तुमच्या खिशावर चोट देऊ शकतो.

अशी समस्या उद्भवल्यास त्याची लक्षणे खालीलप्रमाणे दिसतात :

● इंजिन लवकर सुरू होत नाही.
●सुरू होताना आणि सुरू झाल्यावर इंजिनमध्ये कंपन (वायब्रेशन) जास्त होते.
● इंजिनचा आवाज जास्त येतो.
● जास्त इंधन वापरल्या जाते, मायलेज घटते.
●पूर्वीप्रमाणे इंजिन पॉवर आणि टॉर्क उत्पन्न करत नाही, परिणामी इंजिन लवकर ओव्हरलोड होते.
● कार चालू असताना पेट्रोल/डिझेलचा वास येतो.

2. सायलेन्सर मधून काळा धूर | Black smoke from Engine exhaust

इंजिन चालू असताना धुराचा रंग काळा किंवा फिकट काळा असेल तर याचे कारण आहे की अपूर्ण इंधन ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात काजळी तयार होऊन ती इंजिनमध्ये आणि एक्झॉस्ट टेलपाईपमध्ये जमा होते आणि कालांतराने ती धुरासोबत (black smoke from engine) वातावरणात सोडली जाते. इंधनाचे ज्वलन अपूर्ण का होते किंवा आणखी काही कारणामुळे एक्झॉस्टमधून काळा धूर येतो का याचाही तपास करणे आवश्यक आहे. 
 
Black smoke from diesel engine,Blue smoke from tailpipe, Black smoke from exhaust, blue smoke from bile exhaust, White smoke from Bike exhaust, smoke from car exhaust, black smoke from car exhaust, black smoke from tailpipe, white smoke from tailpipe, blue smoke from tailpipe of car
चित्र : एक्झॉस्ट पाईपमधून काळा धूर निघताना


एक्झॉस्ट पाईपमधून काळा धूर येण्याची कारणे (Reasons of Black smoke from Exhaust/Tailpipe)

ज्यांच्या कारमध्ये डिझेल इंजिन, कार्बोरेटर फ्युएल सिस्टिम किंवा इंजेक्शन फ्युएल सिस्टिम आहेत, त्या सर्वांना हा अनुभव कधी ना कधी आलेला असेलच किंवा हा प्रश्न त्यांचा त्यांच्या डोक्यात आलेला असेलच. अपूर्ण इंधन ज्वलनाचे किंवा वाहनातून काळा धूर येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंबशन चेंबरमध्ये (सिलेंडर ब्लॉकमधे) जाणाऱ्या हवा आणि इंधनाच्या गुणोत्तरामध्ये गडबड (imbalanced Air-Fuel Mixture ratio). म्हणजे एकतर हवा सिलेंडरमध्ये जास्त जात आहे किंवा इंधन जास्त जात आहे. हे प्रमाण बिघडण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की बंद फ्युएल इंजेक्टर, चोक झालेले (धुळीने भरलेले) किंवा छिद्रे पडलेले हवा फिल्टर, भेसळयुक्त इंधन, बंद इंधन पंप (Failed Fuel Pump), कार्बोरेटरची चुकीची सेटिंग, डिझेल स्प्रे नोझल मध्ये खराबी इ. त्याचबरोबर इग्निशन सिस्टममध्ये काही घटक fail होण्यामुळे, जसे की इग्निशन कॉइल, हाय-व्होल्टेज वायर, स्पार्क प्लग इ. मुळे अपूर्ण इंधन ज्वलन होऊन काळा धूर बाहेर येतो. जुन्या, सेकंड हँड कार वापरकर्त्यांना हि काळ्या धुराची समस्या कधीतरी जाणवतेच. अशा वेळेस आपण न घाबरता शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित असते. कारण, इंजिन मधून काळा धूर येते म्हणजे इंजिनला डॅमेज किंवा मोठे नुकसान झाले आहे, असा अर्थ होत नाही. धूर येणे हा प्रॉब्लेम नसून ते बिघाड झाल्याचे लक्षण आहे, ज्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष इंजिन ना उघडताही इंजिनचे आरोग्य समजते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन इंजिन पूर्ण डेड (निकामी) होण्याचा धोका संभवतो.

3. सायलेन्सर मधून निळा धूर |  Blue smoke from Engine Exhaust

इंजिन सुरु असताना बाहेर पडणारा निळा धूर सूचित करतो की इंजिन ऑइल कंबशन चेंबर (सिलेंडर) मध्ये गेले आहे. इंजिन ऑइल सतत सिलेंडर मध्ये जाऊन पेट्रोल/डिझेल सोबत जळते, त्यामुळे ऑईलची लेव्हलही कमी होत जाते. हे ऑइल पेट्रोल सारखे पूर्ण जळत नाही त्यामुळे खूप धूर तयार होतो तसेच त्या अपूर्ण जळालेल्या ऑईलचा थर इंजिन सिलेंडर मध्ये जमतो व इंजिनची कार्यक्षमता कमी करतो. 
Blue smoke from tailpipe, Black smoke from exhaust, blue smoke from bile exhaust, White smoke from Bike exhaust, smoke from car exhaust, black smoke from car exhaust, black smoke from tailpipe, white smoke from tailpipe, blue smoke from tailpipe of car

इंजिन ऑइल सिलेंडर मध्ये येण्याची कारणे:

1) ज्यावेळेस इंजिन सुरू होते तेव्हा पेट्रोल/डिझेलच्या ज्वलनामुळे पिस्टन मागे-पुढे ढकलल्या जाते आणि परिणामी वाहन चालते. ज्यावेळेस ही पिस्टन असेम्ब्ली म्हणजे पिस्टन आणि त्याचा सभोवती असलेल्या पिस्टन रिंग ज्या सील प्रमाणे काम करतात, घासल्या जातात तेव्हा पिस्टन आणि बोअर (ज्या छिद्रात पिस्टन बसतो) मध्ये एक छोटा गॅप तयार होतो. या गॅप मधून इंजिनमधील ऑइल हळू हळू पेट्रोल ज्वलन कक्षात (सिलेंडर) येते व पेट्रोल सोबत जळते.
यामुळे कार किंवा बाईकच्या सायलेन्सर मधून निळसर धूर बाहेर पडतो. 

2) हेच इंजिन ऑइल आतमध्ये असलेल्या ऑइल पंप द्वारे टायमिंग चैन, टॅपेट, आणि फ्युएल इनलेट व्हॉल्व्ह च्या सील वर सतत सोडले जाते. इंजिन हेडच्या वर असलेले फ्युएल इनलेट व्हॉल्व्ह आणि फ्युएल एक्झास्ट व्हॉल्व्ह सतत चालू-बंद होत असतात त्यामुळे त्यांचे सील कधी-कधी क्रॅक होतात. या क्रॅक मधूनही इंजिन ऑइल सिलेंडर मध्ये प्रवेश करते त्यामुळे कारच्या एक्झास्ट मधून निळा धूर बाहेर पडतो.

Blue smoke from exhaust pipe, Blue smoke from tailpipe, Black smoke from exhaust, blue smoke from bile exhaust, White smoke from Bike exhaust, smoke from car exhaust, black smoke from car exhaust, black smoke from tailpipe, white smoke from tailpipe, blue smoke from tailpipe of car
चित्र: पिस्टन, पिस्टन रिंग, हेड व्हॉल्व्ह (पिस्टन असेम्ब्ली)

3) अनेकजण बाईक, कारचे इंजिन ऑईल बदलण्याकडे दुर्लक्ष करतात. काही वाहनधारकांना तर लक्षातही नसते की या आधी इंजिन ऑईल कधी बदलले आहे. पण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे अन्यथा जास्त वापरामुळे इंजिन ऑइल घट्ट येते, ऑईलचे सर्कुलेशन इंजिनमधे योग्यरीत्या होत नाही, जळल्यामुळे ऑईलची ल्युब्रिकंट क्षमता कमी होत जाते. यामुळे इंजिनमधील पिस्टन काम करण्यास असक्षम होऊ लागतात तसेच मायलेजवरही परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे कार किंवा दुचाकी रस्त्यावरच कधीही बंद पडू शकते.

इंजिन ऑईल न बदलल्यास इंजिनवर ताण येऊन पेट्रोल/डिझेल जास्त लागते. इंजिन खूप जास्त तापते आणि त्यामधून आवाजही जास्त येतो. बऱ्याचदा इंजिन फेल होते, बाईकचा ब्लॉक पिस्टन खराब होतो आणि इंजिन मधून खूप जास्त निळसर धूर येतो. यामुळे ऑईलपेक्षा दहापट जास्त खर्च दुरुस्तीवर येतो.

ज्यावेळेस निळा धूर बाहेर पडतो त्यावेळेस मेकॅनिक नेहमीच आपल्याला इंजिनच्या हेड-ब्लॉक ची दुरुस्ती करायला सांगतात. या दुरुस्ती मध्ये सहसा पिस्टन रिंग्स, इनलेट-एक्झास्ट व्हॉल्व्हचे सील किंवा कधी कधी पिस्टन सुद्धा बदलावा लागतो. सोबतच हेड कव्हर आणि सिलेंडर साफ करणे सुद्धा आवश्यक असते. जास्तच खराब परिस्थितीमधे इंजिनचे हेड- ब्लॉक असेम्ब्ली सुद्धा बदलावा लागू शकतो, जे खूपच खर्चिक असते.

ज्याप्रमाणे इंजिन ऑइल सिलेंडर (ब्लॉक) मध्ये प्रवेश करते त्याचप्रमाणे पिस्टन-बोअर गॅपमधून न जळलेले पेट्रोल/डिझेल सुद्धा ऑइल चेंबर मध्ये प्रवेश करते. त्यामुळे इंजिन ऑइल पातळ होऊन इंजिनमधील फिरणाऱ्या पार्ट्सला योग्य लुब्रिकेशन मिळत नाही, परिणामी पिस्टन आणि बोअरमध्ये घर्षण वाढते, गेअरचे घर्षण वाढते त्यामुळे त्यांची झीज होऊन ते तुटू शकतात. इंजिनच्या सिलमधून ऑइल लीक होऊन ते इंजिनच्या बाहेरही पडते.


निष्कर्ष :

एक्झॉस्ट पाईप / सायलेन्सर मधून निघणारा धूर (smoke from silencer), त्याचा रंग याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. वाहनातून येणारा धूर इंजिनमध्ये बिघाडाचे संकेत देतात, त्यामुळे धुराचे बारकाईने निरीक्षण करून लवकर दुरुस्ती केल्यास मोठ्या खर्चापासून वाचू शकतो. तसेच आपल्याला नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कळून येईल आणि आपण मेकॅनिक कडून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतो.

ऑटोज्ञान च्या सर्व वाचकांना निरोगी आणि धुरमुक्त प्रवासाच्या शुभेच्छा..! 
 

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा