संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Tips & tricks to save money while buying New Car | नवीन कार खरेदी करताना घ्यायची काळजी आणि टिप्स

३ टिप्पण्या

नवीन कार विकत घायची म्हटलं की आपण खूप उत्साहात असतो, त्यातही ही आपली पहिली कार असेल तर आनंद गगनात मावेनासा होतो. या आनंदासोबतच मनात थोडं विचार आणि टेंशनचं वादळसुद्धा उठू शकते. कारण कारसारखी महागडी वस्तू पहिल्यांदाच खरेदी करायची म्हटल्यावर थोडं टेन्शन तर येणारचं ना? म्हणूनच आपण या लेखामध्ये वाचणार आहोत की पहिल्यांदा कार खरेदी करताना काय-काय काळजी घ्यावी आणि कशाप्रकारे तयारी करावी, जेणेकरून डोक्यात टेन्शन राहणार नाही आणि अगदी आनंदाने नवीन कार घरी घेऊन येऊ.

Tips and tricks for buying new car from  Showroom


सर्वप्रथम

1. कोणत्या कंपनीची कार घ्यायची ते ठरवा

2. मॉडेल कोणते घ्यायचे ते ठरवा

3. टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध आहे ना ते तपासा

4. ऑफर/डिस्काउंट ची माहिती मिळवा

5. कार सोबत कोणत्या एसेसरी मिळतात याची माहिती घ्या

6. फायनान्स सुविधा उपलब्ध आहे की नाही जाणून घ्या

7. सर्व्हिस धोरण जाणून घ्या / Car insurance ची माहिती घ्या

8. बुकिंग करण्याआधी कोटेशन काढून घ्या


1. कोणत्या कंपनीची कार घ्यायची ते ठरवा-

कार खरेदीसाठी शोरूम मध्ये जाण्याआधी ठरवा की तुम्हाला कोणत्या कंपनीची कार घ्यायची आहे. 2 ते 3 वेगवेगळ्या कंपनीच्या कार तुम्हाला आवडल्या असेल आणि गोंधळले असाल तर घाबरू नका. त्यांची यादी बनवा. तुम्हाला कोणते व्हेरिअंट घायचे आहे- एन्ट्री लेवल, टॉप लेवल की सेकंड टॉप ते ठरवा. तुम्हाला विश्वास असेल की कंपनी आणि तिची सर्व्हिस चांगली आहे त्याच कंपनीची कार खरेदी करण्यास प्राधान्य द्या. नंतर वेगवेगळ्या कंपनीच्या शोरूम मध्ये जाऊन ती कार प्रत्यक्ष बघू शकता.


2. मॉडेल कोणते घ्यायचे ते ठरवा -

कार कोणत्या कंपनीची घ्यायची हे तर ठरवलं आता त्यांपैकी कोणते मॉडेल घ्यावे हा प्रश्न अजून आहेच. समजा तुम्हाला टाटा कंपनीची कार घायची आहे पण तिगोर, अलट्रोज, नेक्सन, हेक्सा, हरिअर यापैकी कोणते मॉडेल घायचे याच गोंधळात असाल तर आधी तुमचे बजेट, गरजा आणि तुम्ही कोणत्या कामासाठी कार घेत आहात हे ठरवूनच मॉडेल निवडा. तसेच बजेटनुसार टॉपचं की त्यापेक्षा कमी मॉडेल घ्यायचं हे पण आधीच ठरवा. दररोजच्या वापरासाठी कार घ्यायची असेल तर डिझेल वर चालणारी कार तुमच्यासाठी उत्तम राहील, अन्यथा पेट्रोल कारच घ्या.


3. टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध आहे ना ते तपासा - 

आपण कार आणि मॉडेल तर ठरवलं पण प्रत्यक्षात कोणती कार वापरण्यास योग्य आणि बसण्यास/ प्रवास करण्यास कम्फर्टेबल आहे हे सुद्धा तपासून पाहावे जेणेकरून विकत घेतल्यांनातर मनात शंका नको. त्यासाठी तुम्ही शोरूम ला भेट देऊन , तुम्ही ठरवलेल्या मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह करण्याची विनंती सेल्समन ला करा. तसेच त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते सुद्धा तपासून घ्या. कार मध्ये बसल्यांनातर हेड space ( डोक्याचा वर किती जागा शिल्लक राहते) आणि लेग space ( मागच्या सीट वर बसल्यास पाय किती लांब करता येतात) ते तपासून पाहावे म्हणजे आपले फॅमिली मेंबर साठी कार ठीक राहील की नाही हे कळून येईल. त्याचप्रमाणे कारमध्ये बसून सर्व काचा बंद करून इंजिन स्टार्ट करून पाहावे , इंजिनचा आवाज केबिन मध्ये जास्त येत असल्यास अशी कार खरेदी करणे टाळावे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे सर्व फीचर्स आहेत की नाही हे सुद्धा  टेस्ट ड्राईव्ह मध्ये लक्षात येईल.


4. ऑफर/डिस्काउंट ची माहिती मिळवा -

बहुतेक कार डीलर सणासुदीच्या काळात कार खरेदी वर ऑफर्स (Offers) देतात. त्याची तशी जाहिरात स्थानिक वर्तमानपत्र आणि टीव्ही वर सुद्धा देतात. दिवाळी, दसरा, गणपती उत्सव या काळात अनेक वाहन विक्रेते मोठाल्या डिस्काउंट (Discount Offers on cars) ऑफर देतात. अशा ऑफर्स वर लक्ष ठेऊन तुम्ही कार खरेदी करताना जास्तीत जास्त बचत करू शकता. त्यामुळे कार खरेदी खूप आवश्यक नसेल तर काही दिवस वाट पाहून फेस्टिव ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.


5. कार सोबत कोणत्या एसेसरी मिळतात याची माहिती घ्या

नवीन कार खरेदी करताना त्यासोबत मिळणाऱ्या एस्सेसरी बद्दल आधीच माहिती घ्यावी. त्यासाठी कार कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही ठरवलेल्या मॉडेल बद्दल पूर्ण माहिती घ्यावी. असेंसोरी मध्ये कोणत्या वस्तू मोफत मिळतात व कोणत्या वस्तू विकत घ्याव्या लागतात हे जाणून घ्यावे. विकत घ्यावा लागणाऱ्या वस्तू गरज असेल तरच घ्याव्या अन्यथा खर्च टाळावा.  तसेच कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीला कारसोबत येणाऱ्या टायर, बॅटरी, स्टेपनी, जॅक आणि टूलकिट बद्दल माहिती विचारून घ्यावी, जसे टायर आणि बॅटरी कोणत्या कंपनीची मिळेल इत्यादी. कारण कित्येकदा शोरूम मालक वाहनसोबत येणारे असली टायर आणि बॅटरी बदलून त्याऐवजी स्वस्त आणि लोकल ब्रँड चे टायर व बॅटरी लावतात आणि नंतर ग्राहकांना मनस्ताप होतो.


6. फायनान्स सुविधा उपलब्ध आहे की नाही जाणून घ्या -

कार खरेदी करताना आधीच ठरवा की तुम्हाला खरेदी कशी करायची आहे- कॅश की लोन? लोन/ फायनान्स (Finance) वर खरेदी करायची असेल तर त्याबाबद्दल आधी पूर्ण माहिती करून घ्या. घाई गडबडीत फायनान्स करून तुम्ही संकटात सापडू शकता. कारण फायनान्स केल्या त्यावर 15 ते 20% पर्यंत व्याज अधिक GST सुद्धा लागतो आणि त्यामुळे कार ची मूळ किंमत 20-25% ने वाढू शकते. तसेच लोनची केस करताना सेल्समन त्यामध्ये हेराफेरी करून तुम्हाला आर्थिक नुकसान पोहचू शकते. त्यामुळे शक्य असेल तर पेमेंट/इंस्टॉलमेंट करताना क्रेडिट कार्ड वापरा, याचे खूप फायदे होतील. पैसे उपलब्ध असेल आणि पुढे काही महिने पैशाची आवश्यकता नसेल तरच कॅश मध्ये खरेदी करा.


7. सर्व्हिस धोरण जाणून घ्या -

वर सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर कंपनीची सर्व्हिस पॉलिसी सुद्धा एकदा अवश्य तपासून घ्या. प्रत्येक कंपनीची सर्व्हीस पॉलिसी वेगवेगळी असतात. ते जाणून घेतल्यानन्तरच पुढचा निर्णय घ्या. कार सोबत इन्शुरन्स (Car Insurance) मिळतोय की नाही, कोणत्या प्रकारचा मिळतोय, इन्शुरन्स कंपनी कोणती आहे, इन्शुरन्स (Insurance) किती वर्षांचा मिळतोय ही माहिती सुद्धा नक्की घ्या. फ्री सर्व्हिसिंग किती वर्षे/किती वेळा करता येईल त्यामध्ये काय काय सुविधा असेल ते सर्व कागदपत्रांद्वारे तपासा, सेल्समन च्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका.


8. बुकिंग करण्याआधी कोटेशन काढून घ्या -

सेल्समन सोबत कार च्या किमतीत मोलभाव करा. सोइ-सुविधा, एसेसरी मध्ये काहीही कमी न करता वाहनांची किंमत कमी करण्यासाठी सांगा. शोरूम कडून वाढीव / एक्सटेंडेड वॉरंटी च्या नावाने जास्तीची बिले जोडली जातात, किंमत कमी करायची असेल तर एक्सटेंडेड वॉरंटी घेऊ नका, त्याचा कधीही काहीही फायदा नसतो. हे सर्व करून झाल्यानंंतर सेल्समनला फायनल "कोटेशन" (Quotation)  बनवून मागा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कार बुकिंग करायला/टोकन रक्कम द्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला कमीतकमी किमतीमध्ये, भाव न करता लवकर बुकिंग करता येईल आणि सोबतच अनावश्यक खर्च टळेल.

याव्यतिरिक्त काही शंका मनात असेल तर कंमेंट मध्ये नक्की विचारा. 


Posted By : ऑटोमोबाईल जगत

Related Posts

३ टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा